धानोरात पार पडली चित्रकला स्पर्धा २०२३

237

The गडविश्व
ता.प्र / धानोरा,२४ जानेवारी : तालुक्यामध्ये सकाळ पेपर तर्फे चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. यामध्ये ‘अ’ गट, ‘ब’ गट, ‘क’ गट, ‘ड’ गट आणि ‘इ’ गटात विद्यार्थ्यांनी भाग घेतला.
धानोरा तालुक्यामधील जेएसपीएम महाविद्यालय धानोरा येथे सकाळ चित्रकला स्पर्धेला विद्यार्थ्यांनी हजेरी लावलेली होती. या चित्रकला स्पर्धेला मोठ्या प्रमाणामध्ये शाळेतून सहभाग मिळाला. या चित्रकला स्पर्धेमध्ये जे एस पी एम महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रियदर्शनी हायस्कूल धानोरा, जिल्हा परिषद जिल्हा परिषद शाळा चवेला, जिल्हा परिषद शाळा सालेभट्टी, शासकीय आश्रम शाळा सोडे, जय पेन हायस्कूल माळंदा, चाइल्ड प्रोग्रेस कॉन्व्हेंट प्रायमरी स्कूल धानोरा, चिल्ड्रन पॅराडाईज कॉन्व्हेंट स्कूल धानोरा, रॉयल पब्लिक स्कूल धानोरा, कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय धानोरा या शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. ही चित्रकला स्पर्धा धानोरा तालुक्यामध्ये प्रथमच होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाच व आनंदाचे वातावरण होते. विद्यार्थी सकाळ पासूनच महाविद्यालयाकडे येत असताना विद्यार्थ्यांच्या रांगाच्या रांगा दिसून येत होत्या यावरून विद्यार्थ्यांमध्ये या चित्रकला स्पर्धेविषयी असणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून येत होता. अशा चित्रकला स्पर्धा यानंतर सुद्धा आयोजित केल्या जावे असे विद्यार्थ्यांच्या पालकांकडून व शाळेच्या शिक्षकाकडून असे चित्रकला स्पर्धा भरवत राहावे असे शिक्षकाचे म्हणणे होते. महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये आणि सभागृहामध्ये ही चित्रकला स्पर्धा पार पडली. चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सर्व शाळेतील शिक्षक पालक आणि जेएसपी एम महाविद्यालयाचे कर्मचारी बालाजी राजगडे यांनी परिश्रम घेतले. ही स्पर्धा सकाळ पेपरचे धानोरा तालुका प्रतिनिधी भाविकादास करमनकर यांच्या मार्गदर्शनातील पार पडली हे विशेष.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here