The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १५ ऑगस्ट : स्थानिक श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री.जी.सी पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमाच्या अंतर्गत तसेच हर घर तिरंगा या उपक्रमाच्या अंतर्गत पंचप्राण शपथ ग्रहण व वसुधा वंदन कार्यक्रम घेण्यात आले.
१३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत हर घर तिरंगा हा उपक्रम राबवायचा होता त्यानुसार १३ ऑगस्ट ला महाविद्यालयात ध्वज फडकविण्यात आले तसेच ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमास अंतर्गत नगरपंचायत धानोरा येथे शिलाफलक व पंचप्राण शपथ व वसुधा वंदन कार्यक्रमात महाविद्यालयाच्या रा.से.यों विभागाने व स्वयंसेवकांनी सहभाग दर्शविला. १५ ऑगस्ट ला हर घर तिरंगा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. ‘मेरी मिट्टी मेरा देश’ या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांना व कर्मचारी वृंदांना शासनाच्या निर्देशानुसार पंचप्राण शपथ ग्रहण व वसुधा वंदन हे कार्यक्रम पार पडण्यात आले. प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांचे अर्ग दर्शनात कार्यक्रम आयोजित करण्यात आले. याप्रसंगी प्रा.डॉ.संजय मुरकुटे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ.प्रा.विना जंबेवार उपस्थित होत्या. आभार डॉ.प्रियांका पठारे यांनी मानले. त्यासोबत प्रा. प्रशांत वाळके, प्रा. खोब्रागडे, प्रा.धाकडे, प्रा.मांडवगडे, प्रा.वटक, भास्कर कायते,प्रा. आवारी, प्रा रणदिवे इत्यादी सर्व कर्मचारी वृंदातसेच महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते.