– जे.जस.पि.एम.काँलेज प्रचार्याला दिले निवेदन
The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २६ : मुंबई येथील आझाद मैदान येथे १६ ऑगस्ट २०२४ पासून सुरू असलेले आंदोलन जवळपास दीड महिने सुरू असूनही शासन अंशतः अनुदानित शाळा कनिष्ठ महाविद्यालयाला टप्पा वाढ शासनाच्या चुकीने ३० दिवसात त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना टप्पा वाढ व पुणे स्तरावरील शाळांना अनुदान पात्र घोषित करून वेतन मंजूर करणे या मागण्यासाठी हुंकार आंदोलन सुरू केले आहे. शासनाला वारंवार विनंती करूनही शासन दखल घेण्यास तयार नाही. म्हणून शाळांना गुरुवार २६ सप्टेंबर पर्यंत शासनाने न्याय द्यावा अन्यथा येत्या शुक्रवार २७ सप्टेंबर २०२४ ला महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळा कनिष्ठ महाविद्यालय एक दिवसाचा शैक्षणिक बंद पुकारण्यात येत आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी गडचिरोली यांना तसे निवेदन सुद्धा देण्यात आलेले आहे. संपात सहभागी होण्यासाठी जे. एस .पी. एम. महाविद्यालय येथील प्राध्यापकांनी प्राचार्य यांना महाविद्यालय बंद ठेऊन मुंबई येथे आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्राचार्य यांना निवेदन दिले आहे.
एक दिवसाचे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान पुढे एक दिवस अतिरिक्त कार्यभार करून भरून काढण्यात येईल असे आश्वासन यावेळी निवेदनातून देण्यात आले आहे.
निवेदन देताना प्रा. बी. पी. करमनकर, प्रा .विराग रणदिवे, प्रा .विजय आभारी, प्राध्यापक टी. बी. धाकडे, प्रा .के. आर. खोबरागडे, प्रा .निवेदिता वटक मॅडम उपस्थित होते.
