– आम्ही आमच्या आरोग्यासाठी स्वंयसेवी संस्थेचे पत्रकार परिषदेत आवाहन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २५ : महिलांवरील हिंसाचार हे मूलभूत मानवी हक्काचे उल्लंघन आहे, जागतिक स्तरावर सरासरी ३ पैकी १ स्त्री शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार ग्रस्त आहे ही परीस्थीती बदलण्याकरीता कायद्यात व धोरणात बदल होण्याची गरज आहे. संस्थेच्या वतीने महिला हिंसा विरोधी मानसिकता व संवेदनशीलता जागृत करण्याकरीता मोहीम सूरू करण्यात आली आहे. या मोहीमेत मानवतेचा दृष्टीकोण ठेवत सामान्य नागरिकांनीही सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था कुरखेडाच्या वतीने आज सोमवार रोजी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आले.
जागतिक महिला हिंसा विरोधी पंधरवाडा २५ नोव्हेंबर ते १० डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. या मोहीमेत आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्था मागील १८ वर्षापासून कार्यरत आहे. ग्रामीण ते जिल्हा प्रशासन व राज्य शासन पर्यंत पोहचत महिलांचा समस्येवर वाचा फोडण्याचे काम संस्थेचा वतीने करण्यात येत आहे. यावर्षी २०२४ च्या थीमवर आधारित स्त्री हिंसा विरोधी पंधरवाडा अभियानात महिलावरील विविध मार्गाने होणारे अत्याचार समजून घेणे व त्यावर प्रतिबंधात्मक उपाय तसेच अत्याचार विरोधी संवेदनशीलता जागृत करण्याकरीता जनजागृति मोहीम, पंधरवाडा अभियानात आम्ही आमच्या आरोग्यासाठी संस्थेचा वतीने गडचिरोली जिल्हा सह भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर या ५ जिल्हात राबविण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. तसेच या मोहीमेत मानवतेचा दृष्टीकोणातून सर्व सामान्य नागरीकानीही सहभागी व्हावे असे आवाहन सूद्धा पत्रकार परिषदेत करण्यात आले.
पत्रकार परिषदेला संस्थेचे प्रोजेक्ट संचालक मुकेश शेंडे, क्षेत्र समन्वयक प्रतिमा नंदेश्वर, कार्यक्रम व्यवस्थापक शैदूल टेकाम, कार्यक्रम व्यवस्थापक संगीता तूमडे, गणेश हूलगे, महेश लाडे उपस्थित होते.
