रुग्णांना गावातच मिळतो व्यसन उपचार

149

-विविध गावातील ८५ जणांनी घेतला लाभ
The गडविश्व
गडचिरोली, ३ एप्रिल : मुक्तिपथ गाव संघटनेच्या मागणीनुसार गावातच व्यसन उपचाराची सोय उपलब्ध होत आहे. नुकतेच झारेगुडा १८, कोत्तुर २२, धमधीटोला १४, पाथरगोटा १४, इल्लूर १७ येथे आयोजित गाव पातळी शिबिरातून एकूण ८५ जणांनी दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निश्चय केला आहे.
भामरागड तालुक्यातील झारेगुडा येथील व्यसन उपचार शिबीरामध्ये १८ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. क्लिनिकमध्ये रुग्णांची केस हिस्ट्री दशरथ व विद्या पुंगाटी यांनी घेतली तर रुग्णांना समुपदेशन व औषधीबद्दलची माहिती पूजा येल्लुरकर यांनी दिली. क्लिनिकचे व्यवस्थापन व नियोजन तालुका कार्यकर्ता आबिद शेख यांनी केले. यशस्वीतेसाठी गाव संघटन अध्यक्ष रमेश पुंगाटी, रामा वाचमी, रैनू पुंगाटी, बबलू मडावी यांनी सहकार्य केले. सिरोंचा तालुक्यातील कोत्तुर येथे घेण्यात आलेल्या शिबिरातून २२ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला आहे. यासाठी ग्रामपंचायत समितीचे सदस्य रमेश जनगाम व गाव संघटन महिलांनी सहकार्य केले.
कुरखेडा धमधीटोला येथील एक दिवसीय व्यसन उपचार शिबिरात एकूण १४ रुग्णांनी पूर्णवेळ उपचार घेतला. यावेळी समुपदेशन प्राजु गायकवाड तर केस हिस्ट्री शालिनी व नयना यांनी घेतली. रुग्णांची नोंदणी कान्होपात्रा राऊत हिने केली तर शिबिराचे नियोजन मयूर राऊत यांनी केले. शिबीर यशस्वीतेकरिता पोलिस पाटील पंधरे, जयराम जुळा व संघटनेच्या सदस्यांनी मदत केली. आरमोरी तालुक्यातील पाथरगोटा येथील शिबिरामध्ये १४ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. चामोर्शी तालुक्यातील इल्लूर येथे एक दिवशीय शिबिरातून १७ रुग्णांनी पुर्णवेळ उपचार घेतला. सदर शिबिरात समुपदेशन छत्रपती घवघवे यांनी केले तर पेशंटची केस हिस्ट्री प्रभाकर केळझरकर यांनी घेतली. रुग्णांची नोंदी सोनी सहारे यांनी घेतली. गाव पातळी क्लिनिक यशस्वी होण्याकरिता पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष आणि चामोर्शी मुक्तीपथ टीम यांनी सहकार्य केले. अशाप्रकारे ८५ रुग्णांनी उपचार घेत व्यसनमुक्त होण्याचा निर्धार केला आहे.

(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Game of Thrones) (Lucknow Super Giants) ( Man City) (Bihar Board 10th Result 2023) (JioCinema) (Tata ipl 2023)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here