दुर्गम भागातील रुग्णांना हवी दारूच्या व्यसनातून मुक्ती

351

– ५२ जणांवर उपचार
The गडविश्व
गडचिरोली, २७ डिसेंबर : दारूच्या व्यसनापासून मुक्ती हवी असलेल्या दुर्गम भागातील झिमेला, मणिक्यापूर व ईरुपडोड्री या गावातील ५२ रुग्णांनी मुक्तीपथच्या गाव पातळी शिबिराचा लाभ घेतला.
अहेरी तालुक्यातील झिमेला गावात आयोजित शिबिरात १७ रुग्णांनी पूर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन तालुका संघटक निलम मुळे व तालुका प्रेरक आनंदराव कुम्मरी यांनी केले. यशस्वीतेसाठी माजी सरपंच धर्मराज पोरतेट, आशा वर्कर व अंगणवाडी सेविका व स्पार्क कार्यकर्ता स्वानील बावणे यांनी सहकार्य केले. सिरोंचा तालुक्यातील मनिक्यापुर येथे एक दिवसीय गाव पातळी शिबिर घेण्यात आले. त्यात १८ जणांनी उपचार घेतला. शिबिराचे नियोजन तालुका प्रेरक शंकर गग्गुरी व स्पार्क कार्यकर्ता साईराम सेनीगारपु यांनी केले. दोन्ही शिबिरात रुग्णांची केस हिस्ट्री संयोजिका पूजा येल्लुरकर यांनी घेतली. समुपदेशन साईनाथ मोहूर्ले यांनी केले. धानोरा तालुक्यातील इरुपडोड्री येथील शिबिरात एकुण १७ पेशंटनी नोंद करून पुर्ण उपचार घेतला. शिबिराचे नियोजन मूक्तीपथचे भाष्कर कडयामी यांनी केले. रुग्णांची केस हिस्ट्री संयोजक छत्रपती घवघवे यांनी घेतली तर समुपदेशन प्राजक्ता मेश्राम यांनी केले. यावेळी सरपंच सरिता कुमोटी, रणवीर नरोटे, रावजी कुमोटी, अंगणवाडी सेविका मडावी उपस्थित होते. अशाप्रकारे तिन्ही गाव पातळी शिबिराच्या माध्यमातून ५२ रुग्णांनी उपचार घेत दारूच्या व्यसनातून मुक्त होण्याचा निर्धार केला आहे.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Salman Khan) (David Warner) (Steve Smith) (Sandeep Sharma) ( Chelsea vs Bournemouth ) (Road Accident) (DHanora)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here