नुकसानग्रस्त पूरपिडीतांचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई द्या

165

– शिंदे गटाचे रंजीत बनकर यांची मागणी
The गडविश्व
ता. प्र / आरमोरी, २५ जुलै : जिल्ह्यात सतत मुसळधार होत असलेल्या पावसामुळे आणि धरणातुन सातत्याने निर्गमित केलेल्या पावसामुळे गडचिरोली शहरात ठिकठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली. काही शेतकऱ्यांचे शेत पाण्याखाली गेले, काहींचे घरे गुरे वाहून गेले यामुळे शेतकरी हवालदील झालेला आहे. त्यामुळे तत्काळ पंचनामे करून नुकसानग्रस्त पिडीतांना भरपाई देण्यात यावी अशी मागणी आरमोरी शिवसेना प्रमुख प्रभारी शिंदेसेनेचे रणजीतजी बनकर यांनी केली आहे.
जिल्ह्यात आदिवासी जंगली वनस्पती व नद्यांनी व्यापलेल्या भागात उपजिवीका भागविण्यासाठी जिल्ह्यात भातशेती शिवाय दुसरा कुठलाही व्यवसाय नसल्यामुळे शेतकरी वर्षभर पावसाची वाट बघत असतात आणि शेती करून आपला उदरनिर्वाह करत असतात त्यामुळे यापूर्वी शेतकऱ्यांना दुबार पेरणी करिता सरकारने बी- बियाणे आणि नुकसान भरपाई देण्यात यावे.
काही शेतकऱ्यांनी धानाची रोवनी केली होती. नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे पुर्णपणे चिखलात भुईसपाट झाली आहे. तरी, पुनर्रोवनी करण्यापुर्वी त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशीही मागणी शेतकऱ्यांकडुन होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here