-आ. अडबले यांना दिलेल्या निवेदनातून केली मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १२ ऑक्टोबर : जिल्हा परिषद गडचिरोली अंतर्गत असलेल्या ८ माध्यमिक तथा कनिष्ठ महाविद्यालय शाळा सुरू आहेत. शासनाने पुर्णवेळ शिक्षक भरती न केल्याने अगदी तात्पुरत्या स्वरूपात तासिका मानधान तत्वावर जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांची नियुक्ती करण्यात आली. पूर्वी तासिकेप्रमाणे शिक्षकांची मानधान काढण्यात येत होते. परंतु सत्र २०२२-२३ पासून प्रती तासाप्रमाणे मानधान काढण्यात येत आहेत. त्यामुळे तासिका शिक्षकांचे आर्थिक नुकसान झाले. ना मान, ना धन अशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयातील तासिका तत्त्वावरील शिक्षकांना सरसकट २० हजार रुपये मानधन द्या अशी मागणी आमदार अडबाले यांना निवेदनातुन शिक्षकांनी केली आहे.
एकीकडे शासन सेवानिवृत्त शिक्षकांना एकत्रित २० हजार रुपये मानधन द्यायला तयार आहेत. त्यांना सेवानिवृत्ती वेतन सुद्धा मिळत आहे आणि पुन्हा त्यामध्ये २० हजार रुपये भर घालत आहे. मात्र तासिका तत्त्वावर शिकविणाऱ्या शिक्षकाकडे ५ ते १५ वर्षाचा अध्यापनाचा अनुभव असताना अगदी तटपुंज्या मानधनावर राबविले जात आहे. एवढे करूनही सत्र २०२२-२३ मधील चार महिन्याचे मानधन अजूनपर्यंत मिळाले नाही. यासाठी नागपूर शिक्षक मतदार संघाचे शिक्षक आमदार सुधाकर अडबाले यांच्याकडे आपल्यावर होत असलेल्या अन्यायाची परिस्थिती मांडून निवेदन दिले आहे. यामध्ये चालू सत्राचे ऑक्टोबर पर्यंत मानधान लवकरात लवकर काढण्यात यावी अशी मागणीही तासिका तत्त्वावरील शिक्षकांनी केली आहे. तसेच तासिका शिक्षकाचे अनुभव लक्षात घेऊन यावर्षी होणाऱ्या पवित्र प्रणाली मध्ये तासिका मानधान शिक्षकांना प्राधान्य देण्यात यावे .असे सुद्धा सांगितले आहे.
निवेदन देताना स्नेहल टिचकुले , पोटावर मॅडम, मंडल मॅडम, पियूष आकेवार, दिलीप कुन्घाटकर, वैरागडे मॅडम, गोपाल घोडेस्वार, मनोज इरले व इतर तासिका शिक्षक उपस्थित होते.