– मुक्तीपथ गाव संघटना व ग्रामपंचायतची संयुक्त कृती
The गडविश्व
गडचिरोली, १२ जानेवारी : कोरची तालुक्यातील मसेली गावात चोरट्या मार्गाने अवैध दारूविक्री करणाऱ्यांचा मुद्देमाल नष्ट केल्याची कृती मुक्तीपथ गाव संघटना व ग्रामपंचायतने संयुक्तरीत्या केली. तसेच दोन दारूविक्रेत्यांकडून २५ हजारांचा दंड देखील वसूल करण्यात आला.
मसेली गावात अवैध दारूविक्री बंदीचा ठराव पारित करण्यात आल्यापासून अवैध दारूविक्री पूर्णतः बंद होती. मात्र, गावातील काही विक्रेते चोरट्या मार्गाने अवैध व्यवसाय करीत असल्याची बाब उघडकीस आली. त्यांनतर गाव संघटनेने बैठकीचे आयोजन करून अहिंसक कृतीचे नियोजन केले. त्यानुसार गाव संघटना, ग्रामपंचायत पदाधिकारी व मुक्तीपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या गावात चोरून विक्रीची पाहणी केली असता २ घराच्या आवारात ४ हजार ८०० रुपयांची देशी दारू जप्त करण्यात आली. दोन घरी आढळून आलेला १५ हजार रुपये किंमतीचा मोहफुलाचा सडवा, साहित्य नष्ट करण्यात आले. याप्रकरणी दोन देशी दारूविक्रेत्यांवर दंडात्मक कारवाई समितीद्वारा करण्यात आली. सोबतच पुन्हा दारूविक्री करतांना आढळून आल्यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचे ठणकावून सांगितले असता, हा अवैध व्यवसाय बंद करण्याची ग्वाही दारूविक्रेत्यांनी दिली.

(The Gadvishava) (Gadchiroli News) (Veera Simha Reddy) (Swami Vivekananda Birthday) (HBSE Date Sheet 2023) (PAK vs NZ) (Golden Globes 2023) (Muktipath)