व्यक्तित्व समृद्ध करणारा स्पार्क अभ्यासक्रम : डॉ. प्रशांत बोकारे

122

– स्पार्क अभ्यासक्रम अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ येथे एक दिवसीय कार्यशाळा
The गडविश्व
गडचिरोली, दि.११ : स्पार्क अभ्यासक्रम व्यक्तित्व समृद्ध करणारा आहे. वर्गखोलीतील हे शिक्षण नसून प्रत्यक्ष गावात जाऊन शिक्षण मिळते. दारू व तंबाखूच्या व्यसनाला कमी कसे करता येईल हे शिकवणारा अभ्यासक्रम आहे. असे प्रतिपादन करीत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांनी यावेळी शुभेच्छा दिल्या.
स्पार्क अभ्यासक्रम अंतर्गत गोंडवाना विद्यापीठ येथे एक दिवसीय कार्यशाळा ११ जून रोजी पार पडली. यावेळी कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून मोहन हिराबाई हिरालाल, मॉडेल कॉलेजचे चंद्रमौली, सर्च चे सहसंचालक तुषार खोरगडे, मुक्तीपथ चे प्रभारी संचालक संतोष सावळकर यांच्यासह प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
ग्रामीण समाजात व्यसनाविरुद्ध सामाजिक कार्यक्रम स्पार्क हा अभ्यासक्रम मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठ, सर्च यांच्या समनव्यातुन मागील दोन वर्षांपासून सुरू आहे. प्रती बॅच 13 विद्यार्थी प्रवेश घेऊन अभ्यासक्रम पूर्ण करीत आहेत. या अभ्यासक्रमा अंतर्गत गोंडवाना विद्यापीठात आज पेसा व वनहक्क कायद्याची उपयुक्तता तसेच मीडियाचे महत्व या विषयावर स्पार्क विद्यार्थ्यांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पेसा कायदा काय आहे, महत्व, गावाच्या दारूविक्री बंदीसाठी गावाच्या निर्णयाची ताकद, पेसा कायद्यातून स्वयंशासन, इत्यादी बाबत मार्गदर्शन करीत वृक्षमित्र संस्थेचे संस्थापक मोहन हिराबाई हिरालाल यांनी विद्यार्थ्यांशी प्रशनोत्तरांद्वारे संवाद साधला. दुपारच्या सत्रात सामाजिक कामात मिडियाचे काय महत्व आहे. घटनेची किंवा कार्यक्रमाची बातमी कशी लिहावी. सोशल मीडियाचा वापर कसा करावा, या मुद्द्यावर सकाळचे जिल्हा प्रतिनिधी मिलिंद उमरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आभार सर्चचे तुषार खोरगडे यांनी मानले.

उत्सूक विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावा : चंद्रमौली

सप्टेंबर २०२४ पासून स्पार्क अभ्यासक्रमाची नवीन बॅच सुरू होणार आहे. या विषयात आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी आवर्जून प्रवेश घ्यावा. मॉडेल डिग्री कॉलेज गोंडवाना विद्यापीठ किंवा सर्च येथे संपर्क साधावा असे आवाहन मॉडेल डिग्री कॉलेजचे चंद्रमौली यांनी केले.

(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #muktipath )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here