– थोरात यांच्या हस्ते व्हॉईस ऑफ मीडिया राज्य अधिवेशन शिर्डीच्या स्मरणिकेचे प्रकाशन
The गडविश्व
शिर्डी, दि. ०२ : पत्रकारितेतील पूर्वीचे स्वरूप बदलले आहे. सकाळी उठल्याबरोबर पेपर आणि चहा यांची सवय आजही आपणास असल्याचे सांगत सकाळी उठल्या उठल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिसतो हे घातक असून भविष्यात त्याचे दुष्परिणामही आपल्याला दिसणार आहे. आजही पेपर आणि चहाची सवय आम्हाला आहे. प्रिंटिंग प्रिंट मीडिया शाश्वत आहे. कारण घटनेचे विश्लेषण, बारकावे हे केवळ प्रिंट मीडियाच देऊ शकते. प्रिंट मीडियाने मांडलेले विषय मान्यच करावे लागतात. कारण पत्रकारितेचे पायोनियर प्रिंट मीडियाच असल्याचे मौलिक मत विधिमंडळ पक्षाचे नेते तथा राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले .
शिर्डी येथे व्हाईस ऑफ मीडिया आयोजित राज्यस्तरीय अधिवेशन प्रसंगी थोरात बोलत होते. थोरात पुढे म्हणाले की,
बाळशास्त्री जांभेकर यांनी पत्रकारितेची सुरुवात केली. त्यांचे आभार मानले पाहिजे. एखादा साधा पेपरही आज चांगला विषय देऊ शकतो. हे नक्कीच कौतुकास्पद आहे. प्रिंट मीडियामधील अग्रलेख हे दिशा देणारे होते. अग्रलेखाची परंपरा पत्रकारांनी जपली पाहिजे. परंतु अग्रलेख काळाच्या ओघात बदलत चालले असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. पत्रकारितेमध्ये फायदे तोटे आहेत. चॅनेल मुळे पत्रकारितेचा स्तर बदलला आहे असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे विषयाची चव बदलली असल्याचे ते म्हणाले. डिजिटलमुळे बदल होत गेला. जनमाणसाला बदलण्याची ताकद मीडियात पाहिजे. लोकशाही राज्यघटनेच्या मूल्यांचे पालन आपण केले पाहिजे.
लोकशाही, संविधानामुळे पत्रकारिता आहे. तर दुसरीकडे हुकूमशाही मुस्कटदाबी करीत आहे. अशा मुस्कटदाबीला बळी न पडता साथ देणार नाही असा आत्मविश्वास पत्रकारांनी बाळगला पाहिजे. पॉझिटिव्ह न्यूज हेच समाजाच्या आरसा असल्याचे थोरात म्हणाले.
संघटना आणि चळवळी विषयी ते म्हणाले की संघटनेचा उद्देश एक असावा पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्यात सांगड घालण्याचे काम संदीप काळे यांनी केले असे ही थोरात म्हणाले.
(#thegdv #thegadvishva #gadchirolipolice #gadchirolinews #voiceofmedia)