The गडविश्व
ता. प्र / धानोरा, ३० जुलै : बायफ संस्था कार्यालय धानोराच्या वतीने धानोरा तालुक्यातील २२ गावातील शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक तत्वावर आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी धान, बियाणे, खत व इतर साहित्य विविध गावांतील शेतकऱ्यांना वाटण्यात आले.
या वर्षी बायफ संस्थेच्या मार्गदर्शनाखाली रांगी गावातील गरजु शेतकऱ्यांना लाभ देण्यात आला. त्या शेतकऱ्यांच्या शेतबांधावर धानाचे रोप पट्टा व श्री पद्धतीने रोवनीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. जेने करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होवुन इतर शेतकरी अनुकरण करून पुढील खरिप हंगामात या पध्दतीचा वापर करून स्वतःचे उत्पन्न वाढविण्यास मदत होईल. सदर प्रात्यक्षिके सादर करताना प्रोजेक्ट मॅनेजर लोणारे, माकोडे, मदनकर, वाणी मँडम, रांगी गावातील प्रेरिका सौ.पुनम कावळे उपस्थित होते.