The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १३ ऑगस्ट : केंद्रीय राखीव पोलीस दल च्या वतीने धानोरा नगरपंचायतमध्ये ११ ऑगस्ट ला कमांडैन्ट जसविर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपण करण्यात आले.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सुरू असुन संपूर्ण भारतात ‘मेरी माटी मेरा देश’ या मोहिमे अंतर्गत झाडांचे रोप लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अनिल शर्मा द्वितीय कमान अधिकारी, एच.एस.तिवारी द्वितीय कमान अधिकारी, गुलाब सिंह उपकमांडैन्ट इतर अधिनस्त अधिकारी आणि 113 केंद्रीय राखीव पोलीस दलातिल इतर जवान व धानोरा नगरपंचायत सदस्य, गावकरी उपस्थित होते.
शिवाय फलक व ध्वजारोहण करून नगरपंचायत व पंचायत समिती परिसरात एकूण ५०० झाडे लावण्यात आले. ‘मेरी माटी मेरा देश अंतर्गत ११३ वहिनीच्या वतीने वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.