– गडचिरोली जिल्हा न्यायालयाच्या आवारातील घटना
The गडविश्व
गडचिरोली, दि. ११ : जिल्हा न्यायालयाच्या आवारात अचानक बंदुकीचा आवाज आला आणि परिसरात खळबळ उडाली. ही घटना आज बुधवार ११ डिसेंबर २०२४ रोजी दुपारी ०२.५५ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत पोलीस हवालदार उमाजी होळी (वय ४३) रा. मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
गडचिरोली जिल्हा न्यायालयात प्रधान जिल्हा न्यायाधीश गडचिरोली यांचे एस्कॉर्ट ड्युटीकरीता गडचिरोली पोलिस दलातील पोलीस हवालदार उमाजी होळी हे कर्तव्यावर हजर होते. दरम्यान दुपारी ०२.५५ वाजताच्या सुमारास होळी हे गडचिरोली जिल्हा न्यायालच्या आवारात गाडीत बसलेले असताना त्यांचे स्वत:चे ताब्यातील स्वयंचलीत बंदुक हाताळत असताना बंदुकीतून गोळी झाडली जाऊन ८ पैकी ३ गोळ्या छातीत लागल्याने ते जखमी झाले होते. त्यांना तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल केले असता तपासणीअंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी होळी यांना मृत घोषित केलेले आहे.
पोलीस अधीक्षक नीलोत्पल व इतर वरीष्ठ अधिकार्यांनी घटनास्थळ व रुग्णालयात भेट देऊन घटनेची अधिक माहिती घेतली असून मयत होळी यांचे कुटुंबीयांना गडचिरोली पोलीस दलाकडून सर्व सहायता देण्यात येत आहे. उद्या १२ डिसेंबर २०२४ रोजी उमाजी होळी यांचा अंत्यविधी त्यांचे स्वगाव मोहटोला, बेळगाव ता. जि. गडचिरोली येथे सर्व सन्मानात करण्यात येणार आहे. सदर घटनेप्रकरणी पोलीस स्टेशन गडचिरोली येथे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रेवचंद सिंगनजुडे करीत आहेत.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #forestgadchiroli #fir #gadchirolicoart )
Home Breaking News गडचिरोली : जिल्हा न्यायालयाच्या आवारात अचानक बंदुकीच्या गोळीचा आवाज, पोलीस हवालदाराचा मृत्यू