– कुरखेडातील पोलिस पाटील, सरपंच, गाव संघटनेच्या अध्यक्षांची बैठक
The गडविश्व
गडचिरोली, २८ डिसेंबर : कुरखेडा पोलिस स्टेशन व मुक्तिपथच्या संयुक्त विद्यमाने विविध गावातील पोलिस पाटील, सरपंच, उपसरपंच व गाव संघटनेचे अध्यक्ष यांची बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पोलिस निरीक्षक संदीप पाटील यांनी विविध गावातील अवैध दारूविक्रीचा आढावा घेतला.
येत्या काही दिवसांत सुरु असलेल्या गावातील अवैध दारू विक्री बंद करून, त्या गावात सभा लावून दारुविक्री बंद करण्याकरिता पोलिस निरीक्षक स्वतः त्या सभेला हजर राहणार हा विशेष निर्णय या बैठकीत घेण्यात आला. सोबतच अवैध दारू गावातून हद्दपार करण्यासाठी पोलीस विभाग व गाव प्रमुख तसेच संघटना अध्यक्ष यांच्या समन्वयातून कृती करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर देत पुढील मासिक बैठकीपर्यंत आपणा सर्वाना दारू विक्री बंद दिसणार किंवा फरक जाणवेल अशी ग्वाही पोलिस निरीक्षक यांनी दिली हि मोठी उपलब्धी या बैठकीतून पुढे आली. या बैठकीचे नियोजन मुक्तिपथ तालुका संघटक मयूर राऊत यांनी केले. यावेळी जवळपास ४० गावातील पोलिस पाटील यांनी हजेरी लावली होती. सोबतच गाव संघटनेचे अध्यक्ष, सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.