पोलीस-नक्षल चकमक : स्फोटकांसह इतर साहित्य जप्त

160

– काही नक्षली जखमी व ठार झाल्याचा अंदाज
The गडविश्व
सुकमा, ९ मार्च : जिल्ह्यातील किष्टाराम पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकलेर परिसरात अनेक नक्षली असल्याची माहिती मिळाली असता गुरुवारी सकाळी डब्बामरका पोलिस कॅम्पमधून बाहेर पडलेल्या CRPF कोब्रा 208 व्या बटालियन आणि STF च्या संयुक्त दलाच्या जवानांवर साकलेरजवळ नक्षल्यांनी हल्ला केला. जवानांनीही प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. जवळपास सुमारे ४० ते ४५ मिनिटे चाललेल्या चकमकीत कोब्राचे दोन जवान किरकोळ जखमी झाले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे अशी माहिती आहे. तर सुमारे ५ ते ६ नक्षली जखमी आणि काही ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
घटनास्थळावरून बॅरल ग्रेनेड लाँचर (BGL)सह इतर स्फोटक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत. जवानांमार्फत घटनास्थळाचा शोधमोहीम राबविण्यात येत आहे अशी माहिती आहे. तर घटनास्थळी अनेक ठिकाणी रक्ताचे डागही आढळून आले असल्याने काही नक्षली जखमी व ठार झाले असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here