– मृतक नक्षलीची ओळख पटली नाही
– १२ बोअरच्या बंदुकीसह स्फोटक वस्तूही जप्त
The गडविश्व
बिजापूर, २१ मार्च : जिल्ह्यातील गांगलूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोरचोली आणि तुडक्याच्या जंगल परिसरात मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलीस नक्षल चकमक उडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाल्याची माहिती समोर येत असून मृतदेहही सापडला आहे. सदर ठार झालेल्या महिला नक्षलीची ओळख पटलेली नाही. तर घटनास्थळावरून शस्त्रे आणि अन्य स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्याची माहिती आहे.
माओवाद्यांच्या पीएलजीए कंपनी क्रमांक २ चा कमांडर वेल्ला आणि गंगलूर एरिया कमिटीचा सदस्य दिनेश यांच्यासह इतर गणवेशधारी माओवादी उपस्थित असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारे सोमवारी संध्याकाळी एसटीएफ, डीआरजी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक ऑपरेशनसाठी पाठवण्यात आले असता जवानांनी परिसराला वेढा घातला. तर मंगळवारी सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास पोलीस नक्षल चउडाली. सुमारे अर्धा तास चाललेल्या या चकमकीत जवानांनी गणवेशातील महिला नक्षलीला ठार केले. पोलसांचा वाढत दबाव पाहून नक्षली घनदाट जंगलाच्या आड पळून व चकमकीनंतर जवानांनी परिसराची झडती घेतली असता गणवेशातील एका महिला नक्षलीचा मृतदेह सापडला आहे. मृतदेहाजवळून १२ बोअरच्या बंदुकीसह स्फोटक वस्तूही जप्त करण्यात आल्या आहेत. सध्या मृत नक्षलवाद्याची ओळख पटलेली नाही. मात्र हे एका मोठ्या कॅडरचे नक्षली असल्याचे सांगण्यात येत आहे. तर घटनास्थळावरील अनेक ठिकाणी रक्ताचे निशाण सापडल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे आणखी काही नक्षली जखमी अथवा ठार झाल्याचा दावाही केल्या जात असल्याचे कळते.
(The Gadvishva) (Gadchiroli News Updates) (The gdv) (Muktipath) (Chandrpur News Updates) (Nowruz) (Harry Styles) (Patna railway station) (Hindu Nav Varsh 2023) (Tamilnadu Budget 2023) (Police Naxal Encounter: A Naxalite Woman Killed)