– चकमकीत एका जवनही शहीद, शोधमोहीम सुरू
The गडविश्व
बस्तर, दि. ०५ : छत्तीसगडच्या नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबुझमाड जंगल परिसरात शनिवारी पोलीस नक्षल चकमक उडाली. या चकमकीत चार नक्षली ठार तर एक जवान शहीद झाल्याची माहिती आहे. डीआरजी हेड कांस्टेबल सन्नू करम असे शहीद झालेल्या जवानाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी नारायणपूर, दंतेवाडा, जगदलपूर, कोंडागाव जिल्ह्यांच्या DRG सोबत STF सुरक्षा कर्मचाऱ्यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी अभियानात नारायणपूर आणि दंतेवाडा जिल्ह्यांच्या सीमेवरील दक्षिण अबुझमाड येथील जंगलात गेले होते. यावेळी नक्षल्यांसोबत चकमक उडाली. काही काळ दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरूच होता दरम्यान रात्री उशिरा गोळीबार थांबल्यानंतर घटनास्थळाची पोलिसांनी झडती घेतली असता चार नक्षल्यांचे मृतदेह आणि एके-४७ रायफल आणि सेल्फ लोडिंग रायफल (एसएलआर) यासह अत्याधुनिक शस्त्रे घटनास्थळावरून जप्त करण्यात आली. या चकमकीत डीआरजी हेड कॉन्स्टेबल सन्नू करम यांनाही आपले प्राण गमवावे लागले. अजूनही परिसरात शोधमोहीम सुरू आहे.
https://x.com/ANI/status/1875802850489725358?t=OgIH6XODU6EU3zjTnlvdIA&s=19
(Thegdv, thegadvishva #gadchirolinews #naxalencounter #bastar #cgnews #dantewada #bijapur #gadchirolipolice #cgpolice )