‘या’ जंगल परिसरात उडाली पोलीस-नक्षल चकमक ; एक नक्षली ठार

1862

– रायफल जप्त, मृतक नक्षलीची ओळख अद्याप पटली नाही
The गडविश्व
नारायणपूर, २१ ऑगस्ट : जिल्ह्यातील ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटबेडा जंगल परिसरात सोमवारी सकाळच्या सुमारास पोलीस -नक्षल चकमक उडाली. या चकमकीत एक नक्षली ठार झाला असून ओळख पटली नाही.
ओरछा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भाटबेडा जंगल परिसरात नक्षलवादी प्लाटून क्रमांक 16 प्रभारी मलेश, कमांडर विमला, इंद्रावती एरिया कमिटी ओरछा एलओएस कमांडर दीपक आणि ओरछा एलजीएस कमांडर रामलाल एसीएम आणि इतर काही नक्षली उपस्थित असल्याची माहिती मिळाली असता सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक उडाली.
चकमकीनंतर परिसरात शोधमोहीम घेतली असता एका गणवेशधारी नक्षलीचा मृतदेह आढळून आला. त्याच्याकडून एक 315 बोअरची रायफल आणि 12 बोअरची रायफल जप्त करण्यात आली आहे. दरम्यान या चकमकीत सुरक्षा दलाला कोणतीही हानी पोहचली नसल्याचे कळते. तर घटनास्थळी डीआरजी आणि बस्तर फायटरची कारवाई सुरू असून ठार झालेल्या नक्षलीची अद्याप ओळख पटलेली नाही अशी माहिती आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here