पोलीस स्टेशन पुराडा महिला मेळावा उत्साहात संपन्न

151

-महिलादिनी महिला कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन
The गडविश्व
ता.प्र / कुरखेडा, दि.०९ : गडचिरोली जिल्हा पोलीस प्रशासनाअंतर्गत पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन पोलीस अधिक्षक निलोत्पल, अपर पोलीस अधिक्षक अभियान यतिश देशमुख, अपर पोलीस अधिक्षक कुमार चिंता व उपविभागीय पोलीस अधिकारी भोसले कुरखेडा यांचे मार्गदर्शनात, प्रभारी अधिकारी सपोनि भुषण पवार सा. पोस्टे पुराडा यांचे नियोजनात पोलीस स्टेशन पुराडा येथे जागतीक महिला दिना निमीत्य ०८ मार्च २०२४ रोजी भव्य महिला मेळावा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्रीमती सरोज मारेकरी तालुका व्यवस्थापक कुरखेडा हे होते. उद्घाटक म्हणुन श्रीमती वळवी प्रभाग समन्वयक बचत गट पुराडा, प्रमुख पाहुणे म्हणुन श्रीमती पल्लवी पवार पोस्टे पुराडा श्रीमती निता आत्राम महिला पोलीस अंमलदार पोस्टे पुराडा, श्रीमती नेवजाबाई अत्यालगडे शक्ती प्रभाग संघ मॅनेजर पुराडा, श्रीमती माधुरी बोरकर पो.पा रामगड , श्रीमती उर्मिला कोसरे पुराडा, व पोस्टे परीसरातील महिला पोलीस पाटिल हजर होते.
सदर महिला मेळाव्याचे प्रास्ताविक महिला पोलीस अंमलदार कुमुद ठवकर यांनी केले. त्यानी आपल्या प्रास्ताविकात पोलीस दादालोरा खिडकिच्या माध्यमातुन दिल्या जाणाऱ्या सर्व शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन करुन उपस्थित महिला जनसमुदायाला सर्व शासकिय योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले. तसेच महिला पोलीस अंमलदार निता आत्राम यांनी सायबर गुन्हा व गुड टच बॅड टच बाबत मार्गदर्शन करून सायबर गुन्हा व गुड टच बॅड टच पासुन कशी सावधगीरी बाळगता येईल याबाबत मार्गदर्शन केले. तसेच मंचावर उपस्थित विविध विभागाचे महिला कर्मचारी यांनी आपआपल्या विभागाअंतर्गत येणाया शासकिय योजनाबाबत मार्गदर्शन केले व जागतीक महिला दिनाच्या शुभेच्या दिल्या.
भव्य महिला मेळाव्यात पोलीस स्टेशन पुराडा हद्दितील महिला करिता सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सांस्कृतीक कार्यक्रमात सहभागी होऊन नृत्य सादर करणाया महिलाना पोलीस स्टेशन कडुन प्रोत्साहन पर बक्षिस म्हणुन रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले व ३६ महिलांना साडीचे वाटप व १० बचत गटांना कप सेट वाटप करण्यात आले तसेच उपस्थित नागरीकांना अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महिला पोलीस अंमलदार कुमुद ठवकर यांनी केले तर सुत्रसंचालन महिला पोलीस अंमलदार हिना सहारे यांनी केले, आभार पोलीस अंमलदार धनराज उईके यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता पोलीस स्टेशन पुराडा चे अधिकारी, अमंलदार व एस.आर.पि.एफ चे, अमंलदार यानी सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here