– सभापती पदी गरमळे तर उपसभापती पदावर मानकर यांची निवड
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. ०२ : तालुक्यातील कढोली येथील प्रतिष्ठेचा असलेल्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेवर पोरेड्डीवार गटाने एकहाती सत्ता प्रस्तापीत केली आहे. येथे सभापती पदावर फुकटू गरमळे तर उपसभापती पदावर पुंडलिक मानकर यांची रविवार १ सप्टेंबर रोजी विशेष सभेत बहूमतानी ९ विरूद्ध ३ अशा फरकाने निवड करण्यात आली.
येथील आविका संस्थेचा संचालक पदाच्याबपंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूकीत सहकार महर्षि अरविंद सावकार पोरेड्डीवार गटाने १३ पैकी १० जागेवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळविला होता. आज संस्थेचा सभागृहात उपस्थीत संचालक मंडळामधून सभापती – उपसभापती पदाची निवड प्रक्रिया पार पडली. यावेळी पोरेड्डीवार गटाकडून सभापती पदाकरीता फूकटू गरमळे तर उपसभापती पदाकरीता पुंडलीक मानकर यांचे नामांकन दाखल करण्यात आले होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी श्रेणी १ सूशिल वानखेडे यांनी जवाबदारी पार पाडली तर संस्थेचे व्यवस्थापक पटने यांनी सहकार्य केले. निवडणूकीची व्यूहरचणा जिल्हा नागरी बैंकेचे अध्यक्ष प्रकाश सावकार पोरेड्डीवार यांचा मार्गदर्शनात जिल्हा बैकेचे संचालक खेमनाथ पाटील डोंगरवार, माजी जि प सदस्य भाग्यवान टेकामझ भाजपा अनुसूचित जाति सेलचे जिल्हाध्यक्ष नगरसेवक ॲड. उमेश वालदे, गटनेते काशीनाथ दोनाडकर, आनंदराव आकरे यांनी केली. यावेळी नवनिर्वाचित संचालक मनोहर नारनवरे, यशोधन मडावी, मोडकू श्रीरामे, एकनाथ सोनूले, नुतन कूमरे तसेच पोरेड्डीवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते तर विरोधी गटाचे संचालक सेवाकर सहारे, दिवाकर रंधेय, पिंगला घोडमारे हे सूद्धा हजर होते.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #gadchirolilocalnews #kurkheda )