राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ५ जुलै ला गडचिरोलीत

2767

– खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून माहिती
The गडविश्व
गडचिरोली, २० जून : गडचिरोली येथे राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू ५ जुलै २०२३ ला येणार आहे. अशी माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्राप्त झाली असून गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात देशाच्या राष्ट्रपतींचा हा पहिलाच दौरा ठरणार आहे.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथील प्रशासकीय इमारतीच्या शीलान्यास व दीक्षांत समारोह कार्यक्रमासाठी खासदार अशोक नेते तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चा यांनी राष्ट्रपती महामहीम द्रोपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन नई दिल्ली येथे गडचिरोली येण्यासंबधित चर्चा करून निवेदनाद्वारे
१० मे २०२३ रोजी भेट घेत मागणी केली होती. त्यावेळी सोबत गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे उपस्थित होते. दरम्यान खासदार अशोक नेते यांच्या मागणीनुसार महामहिम राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु ह्या ५ जुलै २०२३ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या शासकीय इमारतीच्या भुमीपुजन व दीक्षांत समारोह कार्यक्रम समारंभाला गडचिरोलीत येणार आहेत अशी माहिती खासदार अशोक नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयातून प्राप्त झाली आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ व्या अमृत महोत्सवी वर्ष निमित्ताने गडचिरोली सारख्या आदिवासी, बहुल आकांक्षीत,अविकसित नक्षलग्रस्त प्रभावी, गडचिरोली जिल्ह्यात पहिल्यांदाच राष्ट्रपती येणार हे एक इतिहासातील पहिलीच कदाचित घटना असेल याचे तुम्ही साक्षीदार होण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही खासदार अशोक नेते यांनी केले आहे.
(the gadvishva, the gdv, President of India DroupadibMurmu
in gadchiroli 5 julai, ashok nete, gondwana university gadchiroli, prashant bokare kulguru), gadchiroli news)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here