– आमदार डॉ. मिलिंद नरोटे, नगराध्यक्ष जयश्री वायललवार सह मान्यवरांच्या हस्ते बक्षीसांचे वितरण
The गडविश्व
गडचिरोली, दि. १४ : शिवकल्याण युथ मल्टीपरपज डेव्हलपमेंट असोसिएशन, गडचिरोली व नेहरू युवा केंद्र गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने चामोर्शी तालुकास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा बक्षीस वितरण समारोह तथा राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद जयंती व राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला उदघाट्क म्हूणन नगराध्यक्ष जयश्री वायलालवार, अध्यक्ष म्हूणन आमदार डॉ. मिलिंद नरोटे, मार्गदर्शक म्हूणन अमित पुंडे जिल्हा युवा अधिकारी नेहरू युवा केंद्र गडचिरोली, प्राचार्य दीपक पाटील शिवाजी हायस्कुल चामोर्शी, संस्थाध्यक्ष अनुप कोहळे, प्रा. रमेश बारसागडे , रोशनीताई वरघंटे, नगरसेविका नगरपंचायत चामोर्शी, माजी प. स. सदस्य प्रमोद भगत, शिल्पा राय माजी जिल्हा परिषद सदस्य गडचिरोली, कविताताई किरमे, श्रावण पाटील सोनटक्के, नीरज रामानुजमवार, नरेश अलसावार, संजय खेडेकर, राजू पाटील चौधरी, शेषराव कोहळे, विनोद किरमे, रोशन कोहळे, दिलकुस बोदलकर, संतोषी सूत्रपवार, अतुल दूधबळे सह महाविद्यालयाचे प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
मान्यवरांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकून विद्यार्थ्यांना उज्वल भविष्याकरीता मार्गदर्शन केले.
‘अ’ आणि ‘ ब’ अश्या दोन गटात पार पडलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत तालुक्यातील ११ परीक्षा केंद्रावर १५०० हुन अधिक विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त पणे सहभाग नोंदविला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाकरीता संस्थाध्यक्ष अनुप कोहळे, रोशन कोहळे, सहसचिव संतोषी सूत्रपवार, जितेश शेट्टीवार, विनोद किरमे, तेजस कोंडेकर, अतुल दूधबळे, गजानन कुणघाडकर, दिलखुश बोदलकर, कृतिका काठवले, गणेश सूत्रपवार, विकी मादेशवार, दुष्यन्त वैरागडे, हरीश कूनघाडकर, दिलीप कूनघाडकर, जगदीश देशमुख, गितेश वैरागडे ,तेजश्री मोंगरकर ,अर्चना सातार, सुदेशना भैसारे ,आदित्य सातपुते, नागेंद्र बोदलकर , श्रुती वैरागडे, अंकुश चीळगे, रवीना दुधबडे, कुणाल आभारे, निखिल बोरुले, सौरव भोयर, अंकित डोहाळे, तनवी मूलकलवार, ईशा मूलकलवार, नवनाथ तुंबडे ,सोनू सिडाम ,प्रफुल गेडाम यांनी सहकार्य केले.
“अ’ गट विजेते स्पर्धक –
प्रथम ख़ुशी खेडेकर, द्वितीय (विभागून ) हिमानी ओंडारे, सलोनी भगत, तृतीय शिवानी वडे, प्रोत्साहनपर पुरस्कार प्रियंका बारसागडे, अश्वि कंदीलवार, रुपेश गव्हारे, आर्ची मुलकलवार यांना अनुक्रमे 5 हजार, 3 हजार, 2 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रस्तीपत्र तर प्रोत्साहनपर विजेत्यांना पाचशे रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.
‘ब’ गट विजेते स्पर्धक –
प्रथम (विभागून) पियुष पत्रजवार, विग्नेश मडावी, द्वितीय अभिषेक हजारे, तृतीय (विभागून) अमन अन्नमवार, आशिष खोब्रागडे, निशा कपाट, प्रोत्साहनपर कल्याणी बामनकर, वैष्णवी गंगूलवार, होमराज मोगरकर यांना अनुक्रमे 7 हजार, 5हजार, 3 हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रस्तीपत्र तर प्रोत्साहनपर विजेत्यांना पाचशे रुपये रोख व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.