The गडविश्व
ता. प्र/ धानोरा, दि. २९ : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने घेण्यात आलेल्या तालुका क्रीडा अधिकारी २०२२-२३ परीक्षेत गुट्टेकसा येथील रहिवासी प्रा. मंगला शेंडे या लेखी व मुलाखत परिक्षेत उत्तीर्ण झाल्या आहेत.
त्यांचे पाचवी पर्यंतचे शिक्षण शासकीय आश्रमशाळा कोरची येथे झाले. १९९६ साली सुरू झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा प्रबोधिनीची कोरची, गडचिरोली व नागपुर येथे फिजिकल फिटनेस टेस्ट व मेडिकल टेस्ट देवून ३६० विद्यार्थ्यांमधून ३६ मुले व एकमेव मुलगी मंगला शेंडे यांची निवड झाली. सहावी ते नववी पर्यंतचे शिक्षण अमरावती येथील क्रिडा प्रबोधिनीत राहून तेथील रामकृष्ण क्रीडा विद्यालयातून शिक्षण घेतले. तसेच ज्युडो या खेळाचे प्रशिक्षणही क्रीडा प्रबोधिनी अमरावती येथून १९९६ ते २००० सालापर्यंत मार्गदर्शक डॉ.सतीश पहाडे यांनी दिले. त्यानंतर २००० साली पुणे हे क्रीडा प्रबोधिनीचे सेंटर असल्यामुळे पुण्यात शिफ्ट/स्थलांतरित करण्यात आले. त्यामुळे मंगलाचे शिक्षण पुण्यातून दहावी, बारावी, मॉडर्न कॉलेज पुणे मधून बी.ए.(अर्थशास्त्र) एम.ए.(मराठी व मानसशास्त्र) या विषयातून पुर्ण केले. तसेच पुण्यातील नामांकित चंद्रशेखर आगाशे शारीरिक शिक्षण महाविद्यालयातून बी.पी.एड केले. तसेच याच महाविद्यालयातून सध्या त्या पी.एच.डी.करत आहेत. तसेच एम.पी .एड. व एम. फिल. पुणे विद्यापीठातील शारीरिक शिक्षणशास्त्र विभागातून झालेले आहे. २०१२ सालापासून श्री सिद्धिविनायक महिला महाविद्यालय,
कर्वेनगर पुणे येथे सहाय्यक प्राध्यापक या पदावर कार्यरत आहेत. तसेच त्यानी केंद्रीय विद्यालय खडकी व आर.एच.ई. आर्मी पब्लिक स्कूल, विसडोम वर्ड्स स्कूल पुणे येथेही काम केलेले आहे.
क्रीडा प्रबोधिनी अमरावती व पुणे येथे असातांना १९९६ ते २००८ यादरम्यान ज्यूडो या खेळामध्ये त्यांनी १६ नॅशनल खेळले असून त्यात तीन गोल्ड, दोन सुवर्ण व आठ ब्राँझ पदके पटकाविले आहेत. तर १९ वेळा राज्यस्तरीय स्पर्धेत सतत सुवर्ण पदक मिळविले आहे. तसेच पाच वेळा उत्कृष्ट जुडो पटूचा मानही मिळाला आहे. त्याना ज्यूडो या खेळातील ब्लॅक बेल्ट असून त्या महाराष्ट्र राज्याच्या जुडोच्या रेफ्री आहेत. २००९ सालचा गडचिरोली जिल्ह्याचा जिल्हा क्रीडा पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे.
त्यांनी कुस्तीमध्ये ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी खेळले आहे. ॲथलेटिक्सच्या(१००मी.)धावणे स्पर्धेत राज्यस्तरावर सहभाग घेतला आहे. २००१ साली जपान(फुफुका) येथे होणाऱ्या वरिष्ठ आंतर्राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली होती, परंतू व्हिसा न मिळाल्याने तिला स्पर्धेत सहभागी होता आले नाही, याची खंत मंगलाला कायम भासते.
पुण्यात राहून त्या स्वसंरक्षण व ज्यूदो या खेळाचे प्रशिक्षण देत आहेत,ज्यूदो या खेळत एकूण २ विद्यार्थिनी या राष्ट्रिय स्पर्धेत तर २२ विद्यार्थिनी या राज्यस्तरीय स्पर्धेत पदक प्राप्त केले आहेत. त्यांच्या मते कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अभ्यास, वेळेचे नियोजन,
सत्याता स्पस्ट करणारी मुलाखतीची तयारी, आणि शिस्तप्रिय व्यक्तिमत्व आवश्यक असते असा यशस्वी करियर वाटा असल्याचे सांगितले. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय स्व.आई-बाबा,स्वतःला, कोरची( गुटेकसा)
येथील शेंडे परिवार, मोठी बहीण वर्षा बाळकृष्ण बोरकर यांना दिलेले आहे.