The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. २५ : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित श्री जीवनराव सिताराम पाटील मुनघाटे महाविद्यालय धानोरा येथील मराठी विभागातर्फे आयोजित अभ्यागत व्याख्यान सत्रात प्रमुख वक्ते म्हणून प्राध्यापक वैभव मस्के आणि अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ. गणेश चुधरी, मराठी विभाग प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी बी.ए. तृतीय वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या पु. ल. देशपांडे लिखित अपूर्वाई या अभ्यास ग्रंथातील प्रवास वर्णन या साहित्य प्रकारावर प्राध्यापक वैभव मस्के यांनी अभ्यासपूर्ण विवेचन करून मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. गणेश चुधरी यांनी केले, संचालन प्रफुल तिग्गा यांनी केले तर आभार अंजली वाढई हिने मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रियंका धुर्वे, गौरव गवर्णा, अंजली हलामी, अनिशा मोहुर्ले, योगिता वट्टी इत्यादी विद्यार्थिनींनी सहकार्य केले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
