– हजारोंच्या संख्येने समाजबांधव एकवटले
The गडविश्व
चंद्रपूर, १ ऑक्टोबर : नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस निमित्य जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी मोघे यांनी माना जमातीबद्दल केलेल्या वक्तव्याने समाज बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या त्याचाच निषेध म्हणून आज वरोरा येथे शिवाजी मोघे यांचा माना समाजाच्या वतीने मोर्चा काढून शांततेच्या मार्गाने निषेध नोंदविण्यात आला. तसेच पोलीस स्टेशन येथे मोघे व नाशिक येथील रोशन गांगुर्डे यांच्याविरुद् तक्रार दाखल करत अटक करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. मोर्चाला हजारोंच्या संख्येने माना समाज एकवटले होत.
म्हणून मोर्चात आलो…
माजी मंत्री शिवाजी #मोघे यांनी एका कार्यक्रमात #माना समाजाबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्याकरीता समाजातर्फे #वरोरा येथे निषेध मोर्चा काढण्यात आला होता यावेळी समाजातील एका व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया#warora #mana #manasamaj #nishedhmorcha #chandrpur pic.twitter.com/bOXuAXRq6I— THE GADVISHVA (@gadvishva) October 1, 2023
तक्रारी मध्ये म्हटले आहे की, माना जमात प्रामुख्याने विदर्भातील जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वास्तव्य असून माना ही स्वतंत्र आदिवासी जमात असून तिथी स्वतंत्र धार्मिक, सामाजिक सांस्कृतिक परंपरा आहेत. केंद्र शासनाच्या अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये क्रमांक १८ वर आहे. सन १९५५ मध्ये काका कालेलकर आयोगांनी माना जमातीला अनुसूचित जमातीचे सर्व अधिकार व हक्क बहाल केले आहे. मात्र नाशिक येथील आदिवासी शक्ती संघटनचे रोशन गांगुर्डे यांनी माना जमातीला नाम साम्यचा फायदा घेणाऱ्या आदिवासी नसलेल्या जातीमध्ये समाविष्ट केलेले आहे. तसे पत्रक त्याने फेसबुक या सामाजिक माध्यमावर प्रकाशित केले आहे. त्या पत्रकाचा मथळा हटाव आणि आदिवासी बचाव असा आहे. तसेच बोगस आदिवासी विरुद्ध खरे आदिवासी अशा पद्धतीचा आहे. त्यांची ही कृती केवळ दुद्वेष भावनेतून करून संपूर्ण माना जमातीचा अवमान केला, जमाती जमातीत तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली. या वक्तव्यामुळे संतप्त झाल्याने रोशन गांगुर्डे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा, तसेच नागपूर येथील आदिवासी क्षेत्रबंधन मुक्ती दिवस निमित्य जाहीर कार्यक्रमात माजी मंत्री शिवाजी मोघे यांनी आदिवासी माना जमाती बाबत हमारी सरकार आयी तो हायर पॉवर कमिशन नेमो, उसमे गलती से जो जो जातीया आयी उसमे जो गलती से एन्ट्री आयी है उसमें माना भी है, यह माना भी गलत है यह गोंड माना उसके लिये है, सब माना के लिए नहीं है यह गलत है इसको निकाल डाल, ‘अशा प्रकारचे वक्तव्य केले. या वक्तव्याने संपूर्ण माना जमातीचा अवमान केला, जमाती जमातीत तेढ निर्माण करून अशांतता निर्माण केली या वक्तव्यामुळे संतप्त झाल्याने माजी मंत्री शिवाजी मोघे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली. तर भविष्यात माना जमाती विरोधी असे वक्तव्य केल्यास लोकशाही मार्गाने तीव्र लढा देईल यासाठी शासन व प्रशासन सर्वस्वी जबाबदार समजले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
या मोर्चाला ५ हजार पेक्षा अधिक समाज बांधव एकवटले होते. यावेळी माजी बांधकाम सभापती राजूभाऊ गायकवाड, विकास संस्थेचेे अध्यक्ष अरुण चौधरी, सचिव संजय जांभूले, अरुण भरडे, विद्यार्थी संघटनेचे सल्लागार हरिदास श्रीरामे, विद्यार्थी संघटनेचे महासचिव कुलदीप श्रीरामे, तालुका अध्यक्ष नागेश नन्नवरे, कार्याध्यक्ष निखिल राणे, सदस्य आदित्य जीवतोडे, परेश दडमल, पियुष गजबे, रोशन हजारे व इतर सामाजिक कार्यकर्ते, आदी नागरिक उपस्थित होते.