कौशल्य प्राप्त युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्या : खासदार डॉ. नामदेव किरसान

51

– मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी च्या वतीने विविध मागण्यांना घेऊन जिल्हाधिकारी कार्याल्यावर मूक मोर्चा
The गडविश्व
गडचिरोली, दि. २० : राज्य सरकाराच्या वतीने युवकांमध्ये कौश्यल विकसित करण्याकरीता, मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत राज्यातील युवकांना ६ महिन्याचे प्रशिक्षण म्हणून विविध शासकीय कार्यालयात मानधन तत्वावर कामावर सामावून घेतले, या युवकांचा सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून आता सहा महिन्या नंत्तर पुढे काय? असा प्रश्न चिन्ह युवा प्रशिक्षनार्थी समोर पडला असून, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षनार्थी, गडचिरोली जिल्हा संघटनेच्या वतीने, प्रशिक्षनार्थीना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याच्या प्रमुख मागणीला घेऊन, जिल्हाधिकारी कार्यालय गडचिरोली येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या मूक मोर्चात गडचिरोली -चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी उपस्थिती राहून मार्गदर्शन केले.
युवकांमध्ये कौशल्य विकसीत करुन त्यांना रोजगार क्षम बनविण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केले मात्र आता त्यांचे सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण होत असून त्यांच्या समोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याने शासनाने सहा महिने प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या युवकांसाठी रोजगाराकरीता कुठल्याही पद्धतीची व्यवस्था केली नाही, अश्या प्रशिक्षनार्थी करीता कायस्वरूपी रोजगार उपलब्ध करून देण्याची व्यवस्था मुख्यमंत्र्यांनी करावी अशी मागणी खासदार डॉ. नामदेव किरसान यांनी केली असून या संदर्भात आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार डॉ. किरसान यांनी आपल्या मार्गदर्शनीय भाषनात सांगितले.
काँग्रेस पक्ष नेहमी युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणारा पक्ष असून प्रशिक्षनार्थीना न्याय मिळवून देण्यासाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी नेहमी युवकांच्या पाठीशी खंबीर पणे उभे राहणार असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनी उपस्थित युवकांना दिले.
विविध मागण्यांना घेऊन काढण्यात आलेल्या मूक मोर्चास माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पाटील पोरेटी, महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे सहसचिव ऍड. विश्वजीत कोवसे, शहर अध्यक्ष सतीश विधाते, सुनील चडगुलवार, रजनीकांत मोटघरे, रुपेश टिकले आझाद समाज पार्टी चे धरमानंद मेश्राम, राज बनसोड सह इतर मान्यवर व मोठ्या संख्येने आंदोलक परीक्षनार्थी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here