– शाळा व्यवस्थापन समिती ची मागणी
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २४ ऑगस्ट : जिल्हा परिषद उच्च प्राथमिक केंद्र शाळा, रांगी येथे विद्यार्थी संख्या भरपूर प्रमाणात असताना सुद्धा कार्यरत शिक्षकांची संख्या कमी पडत असल्याने येथे किमान दोन शिक्षक उपलब्ध करून देण्या बाबतच्या मागणी चे निवेदन २२ ऑगस्ट २०२३ रोजी संवर्ग विकास अधिकारी धानोरा यांना दिलेल्या निवेदनातून केली.
धानोरा तालुक्यातील रांगी जिल्हा परिषद केंद्र शाळा आहे. येथिल शाळेत १ ते ७ वर्ग असून शाळेची पटसंख्या एकूण १८५ आहे. वर्ग एक ते पाच ची पटसंख्या १३१ असून ४ शिक्षक कार्यरत आहेत व वर्ग सहा ते सात वी ची पटसंख्या ५४ असून २ शिक्षक कार्यरत आहेत. वर्ग १ ते ५ ची पटसंख्या बघता एका शिक्षकाची आवश्यकता आहे. प्राथमिक शिक्षण हाच विद्यार्थ्यांचा पाया असुन तोच भक्कम करण्याकरिता आल्या अर्थाने शिक्षकांची गरज आहे. शिक्षका अभावी वर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर विपरीत परिणाम होत असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे.
मागील सन २०२१-२२ व २०२२-२३ या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत एक शिक्षक कमी असल्याने शिक्षकावर शिकविण्याचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्यामुळे मुलांच्या शिक्षणाचा दर्जा खालावत आहे. तसेच धानोरा तालुक्यातून जिल्हा परिषद केंद्र शाळा रांगी ची निवड पंतप्रधान यांच्या पीएमश्री योजनेमध्ये तालुक्यातील एकमेव शाळेची निवड झालेली आहे. सध्या स्थितीत विषय शिक्षकाकडे येथील मुख्याध्यापकाचा प्रसार सोपविला आहे. शासकीय कामाच्या बोजामुळे विद्यार्थी अध्यापना कडे लक्ष देण्याकरिता वेळ मिळत नसल्याने शिक्षणावर परिणाम होत आहे. तरी सदर शाळेचा दर्जा कायम टिकवून ठेवण्याकरिता शिक्षक पुरेसे असायला पाहिजे. मुलांचा शिक्षणाचा स्तर उंचावण्याकरिता आपल्या स्तरावरून योग्य कारवाई करून शाळेकरीता एक शिक्षक व उच्च श्रेणी मुख्याध्यापक उपलब्ध करून देण्याची विनंती करणारे निवेदन संवर्ग विकास अधिकारी धानोरा यांना देण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नरेंद्र भुरसे, सरपंचा सौ. फालेश्वरी प्रदीप गेडाम, उपसरपंच नुरज सुरेश हलामी, तंटामुक्त समिती अध्यक्ष तुळशीराम भुरसे.संगिता नितिन कावळे शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, प्रभाकर गोपाळा रोहनकार,राकेश दयाराम कोराम ग्रामपंचायत सदस्य, शशिकला उमाजी मडावी ग्रा.प.सदस्य,मनोज डोमाजी किरमे आदि मान्यवर उपस्थित होते.