पोलीस स्टेशन कटेझरी येथे जनजागरण मेळावा उत्साहात संपन्न

220

The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १३ : अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागातील नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्याकरिता पोलीस मदत केंद्र कटेझरी येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वैद्यकीय अधिकारी डॉ. उमेश धूर्वे यांनी मलेरिया तसेच साथीचे आजार व त्यावरील उपाययोजना यावर मार्गदर्शन केले. प्रभारी अधिकारी जनक वाकणकर यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती देत लाभ घ्यावा असे आवाहन केले. पोलीस उप निरीक्षक प्रदिप साखरे यांनी अंधश्रद्धा निर्मुलन व जादूटोणा कायद्याबाबत मार्गदर्शन केले तर पोलीस उप निरीक्षक अजय भोसले यांनी शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उप निरीक्षक विशाल नल्लावार यांनी केले तर सूत्रसंचालन पोलीस अंमलदार उमेश गवर्णा यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी एसआरपीफ गट क्र.०४ नागपूर व जिल्हा पोलीस यांनी परिश्रम घतले. यादरम्यान एकुण ३२ लोकांचे आधार कॉर्ड नोंदणी करण्यात आली, ०२ लोकांचे आभा कार्ड काढण्यात आले, आधार कॉर्ड डाऊनलोड १०, अधिवास प्रमाणपत्र ०२, जात प्रमाणपत्र ०३, श्रावण बाळ योजना ०२, संजय गांधी निराधार योजना ०१, तसेच खालील हद्दितील गावातील उपस्थीत नागरिकांना साहित्य वाटप करण्यात आले. त्यात महिलांकरिता चप्पल-१००, लहान मुलांना चप्पल -५०, पुरुषांना गमजे ५०, व्हॉलीबॉल व नेट-०५, क्रिकेट बॅट, बॉल व स्टंप किट ०२ तसेच पोलीस स्टेशन समोरबआठवडी बाजारांमध्ये ग्रामस्थ व प्रवाश्यांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्याकरिता १ हजार लिटर साठवणूक असलेली पाणपोई निर्माण करण्यात आली. तसेच ५२ लोकांची वैद्यकीय तपासणी करुन मोफत औषध उपचर करण्यात आले.
सदर मेळाव्यात एकूण २५०-३०० नागरिक उपस्थित होते. उपस्थीत नागरिकांना उत्तम जेवणाची व्यवस्था करुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolipolice #katejhari)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here