– शहरातील मुख्य बसस्थानकावर चोरीचे प्रमाण वाढले
The गडविश्व
गडचिरोली, दि. ०६ : जिल्हा मुख्यालयातील मुख्य बसस्थानकावर एका महिलेची पर्स चोरी गेल्याची घटना गुरुवार ५ सप्टेंबर रोजी दुपारच्या सुमारास घडली. लागलीच घटनेची माहिती स्थानिक पोलिसांना कळवताच पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तपास केला असता अवघ्या दोन तासात छडा लावत पर्स महिलेस स्वाधीन करण्यात आले.
ललिता किशोर बोटकेवार रा. नागपूर नामक महिला ही गडचिरोली बस स्थानकावरून नागपूर जाणाऱ्या बस मध्ये चढल्या. त्यानंतर त्यांना आपली पर्स चोरी गेल्याचे कळाले. चोरी गेलेल्या पर्स मध्ये पैसे आणि मोबाईल होते. घटनेची माहिती युवा मराठा न्यूज गडचिरोलीचे प्रतिनिधी सूरज गुंडमवार यांना माहिती मिळतांच लगेच त्या महिलेसह गडचिरोली पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली. तक्रारीच्या अनुषंगाने उपनिरीक्षक दिपक चव्हाण यांनी तपास सुरू केले. मोबाईलचे लोकेशन ट्रेस करून करून अवघ्या दोन तासामध्ये चोरी गेलेल्या पर्स चा पोलिसांनी शोध लावून त्या महिलेला सुपूर्द केले. महिलेने उपनिरीक्षक दिपक चव्हाण व त्यांच्या टिम चे आभार मानले. पुढील तपास उपनिरीक्षक दिपक चव्हाण, पोलिस हवालदार मेश्राम, बेसरा, पोलिस नाईक, चौधरी, पोलिस शिपाई गवडकर, हिचामी, पूरी, खोब्रागडे करीत आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #gadchirolipolice )