The गडविश्व
गडचिरोली, १८ डिसेंबर : चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याकरिता सुरू झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या ‘परिक्षा’ वर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा मथळा वाचून तुमच्याही मनात अनेक प्रश्नचिन्ह निर्माण होत असतील नेमके प्रकरण काय ? आणि जर गोंडवाना विद्यापीठ ‘परिक्षेत’ नापास असे म्हटले तर नक्कीच विचार करण्यासारखे होईल. मात्र स्पष्टीकरण आणि उदाहरणांसह बघितले तर तुमचा देखील यावर विश्वास होईल हे मात्र नक्की कारणही त्यास तसेच आहे.
गोंडवाना विद्यापीठ हे निशुल्क प्रवेश देणारे एकमात्र विद्यापीठ ठरले आहे मात्र विद्यापीठाच्या ‘परिक्षा’ वर विविध प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. परंतु हे सर्व होत असतांना संबंधित प्रकार हा विद्यापीठाच्या कोणत्याच कर्मचाऱ्याला लक्षात आला नाही काय ? ‘परिक्षा’ बद्दल कोणीही चर्चा केली नाही काय ? त्यामुळे विषयाचे विभाग प्रमुख, समन्वयक, शिक्षक यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होण्यासारखे आहे तसेच त्यामागील कारण तसे आहे. त्या कारणाकडे मराठी विभाग प्रमुख, समन्वयक यांनी देखील लक्ष दिले नाहीत काय ? विद्यापीठाचे कुलगुरू यांचे सुद्धा त्या प्रकाराकडे लक्ष पडले नाही काय ? पडले असेल तर मग मुद्दाम दुर्लक्ष करण्यात आले काय ? मग ते कारणच बरोबर असेल तर विद्यार्थ्यांनी सुद्धा त्याच प्रमाणे विद्यार्जन करावे काय ? जर चुकीचे असेल तर मग त्यात दुरुस्ती का नाही ? असे विविध प्रश्न उपस्थित होत असून गोंडवाना विद्यापीठा च्या ‘परिक्षा’ वर मात्र असे विविध प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. मात्र या परिक्षा बाबत विद्यार्थ्यांनी संभ्रमात न पडलेले बरे. काय आहे प्रकरण? काय आहे कारण ? याचा उलगडा पुढील भागात.

(The Gadvishava) (Gadchiroli News Updates) (Naruto) (The Recruit) (Warhammer) (Bilawal Bhutto on Modi) (Avatar) (Question mark on Gondwana Vidyapeeth’s ‘examination’) (chandrpur) (Argentina vs France 2022)