– सहा शाळांची तालुकास्तरावर निवड
The गडविश्व
गडचिरोली, ३१ जानेवारी : दारू व तंबाखूच्या व्यसनाबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करण्याच्या उद्देशाने प्रश्नमंजुषा व जाणीव जागृती कार्यक्रम घेण्यात येत आहे. त्याअनुषंगाने मूलचेरा तालुक्यातील तीन केंद्रस्तरीय शाळेत घेण्यात आलेल्या उपक्रमात २५ शाळांनी सहभाग दर्शविला. त्यापैकी सहा शाळांची तालुकास्तरावर निवड करण्यात आली आहे.
सुंदरनगर केंद्रस्तरीय उपक्रमामध्ये जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मथुरानगर, गोविंदपुर, हरीनगर, आंबटपल्ली, श्रीरामपूर, भगवंतराव उच्च प्राथमिक शाळा गोमणी, राजे धर्मराव उच्च प्राथमिक शाळा गोमणी आदी आठ शाळांनी सहभाग दर्शविला होता. यामध्ये प्रथम क्रमांक जि प उच्च प्राथमिक शाळा आंबटपली व द्वितीय क्रमांक मथुरानगर शाळेने पटकाविला. या उपक्रमाचे परीक्षक म्हणून ए एम अलोने व चालूकर उपस्थित होते. उपक्रमात २६ विद्यार्थी व बारा शिक्षकांनी उपस्थिती दर्शविली कोणते
मूलचेरा केंद्रस्तरीय स्पर्धेत आठ शाळांनी सहभाग दर्शविला होता. त्यामध्ये जि प उच्च प्राथमिक शाळा भवानीपुर, श्रीनगर, देशबंधूग्राम, विवेकानंद, मोहूर्ली, बोलेपल्ली, मुलचेरा, शासकीय आश्रम शाळा मुलचेरा या शाळांचा समावेश होता. या उपक्रमात बारा शिक्षकांसह २९ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शविली. परीक्षक म्हणून श्रीराम महाकरकार, सी एस गजभिये यांनी काम बघितले. प्रथम क्रमांक देशबंधूग्राम तर द्वितीय क्रमांक मोहूर्ली शाळेने पटकाविला.
गांधीनगर केंद्रस्तरीय उपक्रमामध्ये जि प शाळा विजयनगर, कालीनगर, कोपरअली, लक्ष्मीपूर, विश्वनाथनगर, अडपली चक, गांधीनगर, मलेरा व माध्यमिक आश्रम शाळा लोहारा या नऊ शाळांनी सहभाग दर्शविला. प्रशिक्षक म्हणून एस आर रमतान, बी सी विश्वास, एस यू जाधव यांनी काम बघितला. या उपक्रमात ३१ विद्यार्थ्यांसह १३ शिक्षकांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे, विविध शाळांतील विद्यार्थ्यांनी पोस्टर, गीत गायन, पथनाट्य सादर करून व्यसनाचे दुष्परिणाम योग्यप्रकारे पटवून दिले. सोबतच तंबाखूमुक्त शाळा करण्याचा निर्धार केला. या उपक्रमाचे नियोजन मुक्तीपथ तालुका संघटक रुपेश अंबादे, तालुका चमू, केंद्रप्रमुख, विविध शाळांतील शिक्षकांनी केले.
(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Andhra Pradesh Capital) (Economic Survey 2023) (February) (Priyanka Chopra) (Joao Cancelo) (The Last of Us)