– गडचिरोली पोलीस भरती २०२३ मध्ये निवड
माझे नाव राखी जनार्दन रामटेके मु. खुर्सा पो. मुरमाडी ता. जि. गडचिरोली, माझे प्राथमिक शिक्षण पहिली ते सातवी जिल्हा परिषद शाळा खुर्सा तर माध्यमिक शिक्षण आठवी ते बारावी साईबाबा महाविद्यालय गिलगाव येथे तर पदवी पर्यंतचे शिक्षण वैरागड येथील किसनराव खोब्रागडे महाविद्यालय येथे झाले. तर गोंडवाना विद्यापीठातून माझे एम. ए. चे शिक्षण पूर्ण झाले.
माझे वडील घर बांधकामावर जातात तर आई शेतात मोलमजुरी करते. घरात सरकारी नोकरीवर कोणीही नसताना बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी स्पर्धा परीक्षेची तयारी करायला लागली. गावात स्पर्धा परीक्षेचे वातावरण अनुकूल नसताना मी गडचिरोली येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करायला आली. स्पर्धा परीक्षेची पुरेपूर माहिती नसल्याने योग्य मार्गदर्शनाची मला गरज होती त्यावेळी मला लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी बद्दल कळले आणि मी लक्षवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी गडचिरोली येथे प्रवेश घेतला. प्राध्यापक राजीव सर व दिवाकर शेट्टे सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी अभ्यासाला सुरुवात केली. २०१८ मध्ये मी पहिल्यांदा पोलीस भरती दिली. परंतु मला त्यात अपयश आले. देशात कोरोनाचे संकट आल्याने २०२० या वर्षात कोणत्याही प्रकारे सरकारी नोकरी भरती घेण्यात आलेली नव्हती. घरची आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने मी सारखी तणावात होती. पुढे २०१९ ची जिल्हा पोलीस भरती २०२२ मध्ये घेण्यात आली त्यामध्ये SC प्रवर्गातून परीक्षाकरिता फॉर्म भरला. SC प्रवर्गातून केवळ मुली करिता एकच जागा राखीव होती त्यामुळे आधीच फार तणाव आलेला होता. अभ्यास मनासारखा होता परंतु मैदानी चाचणी करिता माझे शरीर मला साथ देत नव्हते आणि सुरुवातीलाच लेखी परीक्षा असल्याने मला लेखी परीक्षेत ९३ गुण मिळाले. मैदानी चाचणी बाकी होती परंतु मैदानी चाचणीमध्ये गुण कमी मिळाल्याने माझे परत एकदा पोलीस पोलीस होण्याचे आणि घरची परिस्थिती सुदृढ करण्याची संधी मी परत वाया घालवली, परत एकदा मानसिक आणि शारीरिक तणावात मी वावरत होती. त्याच दरम्यान राजीव सरांनी सुद्धा मला रागवलेले होते. आलेली सुवर्णसंधी तू घालवली परत सुरुवातीपासून तुला तयारी करावी लागेल आणि मी परत एकदा तयारी करायला लागली. योगायोगाने अवघ्या काही महिन्यातच परत पोलीस भरती २०२३ ची जाहिरात आली. जिल्ह्यात ४०० पेक्षा अधिक जागा भरल्या जाणार होत्या परंतु खुला प्रवर्गात जागा नव्हत्या. SC प्रवर्गाकरिता मुली करिता केवळ दोनच जागा राखीव होत्या परत एकदा मी मानसिकरित्या खचलेली होती. लेखी परीक्षेत मला चांगले गुण मिळतील याची मला खात्री होती. परंतु मैदानी चाचणीमध्ये मला नेहमीच गुण कमी पडत असायचे आणि त्याच तणाव जास्त असायचा. सुरुवातीला मैदानी चाचणी पार पडली आणि मला ५० पैकी केवळ ३५ गुण मिळाल्याने फार वाईट वाटत होते या वेळेस सुद्धा पोलीस होण्याचे माझे स्वप्न पूर्ण होणार की नाही याचे आणि आता केवळ लेखी परीक्षेची चांगली तयारी मला करायची होती आणि मला लेखी परीक्षेकरिता दोन महिन्याचा कालावधी मिळाला आणि मी त्यात स्वतःला झोकून देऊन गडचिरोली लगत असलेल्या विसापूर येथील सार्वजनिक वाचनालयात लेखी परीक्षेची तयारी करायला लागली. लेखी परीक्षा २ एप्रिलला झाली आणि पेपर झाल्याबरोबर पोलीस विभागातर्फे उत्तरतालिका सुद्धा देण्यात आलेली होती. त्यामुळे मला लगेच लेखी परीक्षेत
किती गुण मिळाले ते मला कळले. आता फक्त अंतिम गुणवत्ता यादी पोलीस विभागातर्फे जाहीर व्हायची होती आणि १२ एप्रिलला अंतिम गुणवत्ता यादी जाहीर झाली. आणि माझे नाव अंतिम गुणवत्ता यादी मध्ये होते. केवळ दोन जागा आणि त्यात माझे नाव होते हे बघून मला आनंद तर झालाच पण माझ्या परिवाराला जो आनंद झाला ते शब्दात व्यक्त करू शकत नाही. मी पोलीस झाल्याच्या आनंदात आई-वडिलांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू बघून माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू आलेत. आज पर्यंत मी माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यात केवळ दुःखाचे अश्रू बघत आली होती परंतु आज मात्र त्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू बघत होती. हा क्षण मी केव्हाच विसरू शकणार नाही माझ्या आई-वडिलांनी मला पोलीस बनवण्याकरिता केलेले अपार कष्ट मी केव्हाच विसरू शकणार नाही. आणि आता आई-वडिलांना आनंदात ठेवण्याची जबाबदारी माझी आहे. मला आज जे यश प्राप्त झाले त्यात लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी चा महत्त्वाचा वाटा आहे. लक्ष्यवेध अकॅडमीचे टीम लीडर असलेले राजीव सर अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्थान आहेत राजीव सर प्रत्येक विषय खूप मनापासून शिकवितात आणि त्यांना प्रत्येक विषय हा तोंडपाठ आहे (मराठी व्याकरण, गडचिरोली जिल्हा, गोंडी- माडिया, इतिहास, भूगोल, राज्यघटना, पंचायत राज ,चालू घडामोडी, इंग्रजी व्याकरण.) राजीव सर विद्यार्थ्यांना शिकविताना कधीही कोणत्याही प्रकारच्या पुस्तकांचा आधार घेत नसतात आणि हे सरांना कसं शक्य आहे हे आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना न कळण्यासारखेच होते म्हणून ते माझ्यासारख्या विद्यार्थ्यांसाठी रोल मॉडेल आहेत. मला राजीव सरांबद्दल बोलताना एवढंच म्हणायचं आहे की, “चित्ते की चाल, बाज की नजर और राजीव सरके पढाने पर कोई संदेह नही कर सकते..!!!” राजीव सर एक आदर्श गुरु,एक आदर्श मार्गदर्शक, आणि त्याचबरोबर एक सामाजिक जाण असलेले व्यक्तिमत्व आहेत.
अनेक गरजू व्यक्तींसाठी राजीव सर नेहमीच मदत करत असतात. गरजू होतकरू विद्यार्थ्यांना नेहमीच नि:शुल्क मार्गदर्शन करत असतात. स्वतःचा वाढदिवस ते नेहमी परिवारासोबत साजरा न करता आपण समाजाचे देणं लागतो याचा प्रत्यय आणून देण्याकरिता गरजू व्यक्तीसोबत साजरा करत असतात. ‘लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी म्हणजे राजीव सर’ हे समीकरण विद्यार्थ्यांच्या मनात ठसलेले आहे. लक्ष्यवेध स्पर्धा परीक्षा अकॅडमी च्या माध्यमातून मला खूप चांगल्या मार्गदर्शकाच्या हाती शिकायला मिळालेले आहे. दिवाकर शेट्टे सर व PSI नितीन सर यांच्या माध्यमातून अंकगणित व बुद्धिमत्ता या विषयाचे मार्गदर्शन मला लाभले आहे तर नंदनवार सर यांच्याकडून मला मैदानी चाचणीचे मार्गदर्शन लाभलेले आहे. मी नेहमीच मला मिळालेल्या यशाकरिता लक्ष्यवेध अकॅडमीच्या टीमची ऋणी राहील.
– राखी जनार्दन रामटेके
(निवड- पोलीस शिपाई मु. खुर्सा पोस्ट मुरमाडी तहसील जिल्हा गडचिरोली)