The गडविश्व
ता.प्र / धानोरा, १ सप्टेंबर : रक्षाबंधन म्हणजेच बहीण भावाचा पवित्र नाता असतो आणि बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. परंतु सैन्यात असलेल्या सैनिकाला राखी बांधण्यासाठी बहिणीला जाणे शक्य नसते अशा परिस्थितीत सिआरपीएफ ११३ बटालियन मुख्यालय धानोरा येथील जवानांना राखी बांधण्यासाठी जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय धानोरा येथील वर्ग ८,९,११,१२वी तील मुलींनी रक्षाबंधनाच्या दिवशी सिआरपीएफ मुख्यालय येथे जाऊन जवानांना राखी बांधली.
यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीते सादर करून सिआरपीएफ जवानांना मुलींनी लहान रोपट्याचे झाड भेट दिले.
याप्रसंगी ११३ बटालियन कमांडेत जसाविर सिंह, हरिशंकर तिवारी द्वितीय कमांडेट,आदित्य पुरोहित वैद्यकीय अधिकारी व सर्व जवान उपस्थित होते. तसेच त्यांनी सर्व मुलीचे अभिनंदन करून करून अल्पोहाराचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हा परिषद हायस्कूल येथील शिक्षक उपस्थित होते.