The गडविश्व
गडचिरोली, १ सप्टेंबर : विदर्भ इंटरनॅशनल स्कूल गडचिरोली येथील विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनी एकता मुक बधीर विद्यालय मुरखळा येथे रक्षाबंधन आणि राष्ट्रीय क्रीडा दिवस दिनांक २९ ऑगस्ट २०२३ रोजी साजरा केला.
सदर कार्यक्रमाचे प्रमुख शुभम भोयर तसेच करिष्मा ओलख, प्रीती चीचघरे, सनी मोहुर्ले व विद्यालय प्रमुख आणि मुले उपस्थित होती. कार्यक्रमाची थीम ‘निसर्गाशी एकरूप होऊन त्याचे तेथील माणसांची संवर्धन व संरक्षण करा. सोबतच शारीरिक वाढीसाठी खेळ हा खूप महत्त्वाचा घटक आहे. शाळेतील विद्यार्थी तसेच शिक्षक वृंदांनी एकता विद्यालयातील मुलांना राखी बांधून हा उत्सव साजरा केला.
अतिथींचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर वर्ग सातवीचे विद्यार्थ्यांनी रक्षाबंधन थीमवर गीत प्रस्तुत केले. एकता विद्यालय प्रमुख यांनी शाळेचे प्राचार्या नेहारिका मंदारे व उपस्थित कर्मचारी यांचे आभार मानले.