– गरज नसतानाही शेडचे बांधकाम कशाला ?
The गडविश्व
ता.प्र / धानोरा, २६ एप्रिल : तालुक्यातील रांगी येथे जनावरांच्या उपचारा करिता लाखो रुपये खर्च करुण पशुवैद्यकिय दवाखाना दहा वर्षापूर्वी बांधण्यात आला. परंतु दवाखान्यात ना कर्मचारी, कमर्चारी करीता बांधलेली इमारत बेवारस, सिमेट रस्ते बिनकामी, विहिर, नाली बांधकामावर करोडो रुपये खर्चुनही आता नव्याने शेडचे बांधकाम कोणासाठी असा खोचक प्रश्न लोक विचारीत आहेत. येवढा खर्च कशा करीता कंत्राटदाराचे पोट भरण्याकरीता काय ? रांगी येथे दवाखाना श्रेणी १ चा असुन येथील दवाखाण्यात परिसरातील रांगीसह, निमगाव, बोरी, मासरगाटा, निमनवाडा, शिवागाटा जोडलेला आहे. येथिल पशुपालक उपचारा करिता गेले असता कोणाचाच पता लागत नाही. कर्मचाऱ्यांअभावि येथील पशुवैद्यकिय दवाखाना सध्या ओसाड पडलेला आहे. सध्या तिथे कुणाचेच वास्तव्य नाही. तरी तेथे लाखो रुपये शासन खर्च करतो कशासाठी ? दवाखाना खुला दिसतो पण तिथे पशुवैद्यकिय अधिकारी नाही, पशुधन पर्यवेक्षक नाही आणि शिपाईचा सुद्धा पता लागत नाही अशी अवस्था येथील दवाखाण्याची झालेली आहे. लवाजमा मात्र मोठा दिसतो. जिथे कर्मचारी नाहीत तेथे निवासथान कशाला तेही पाण्याच्या टाकीसह, इलेक्ट्रीक, ओटा, दार, खिडक्या विहीर, सिमेंट रस्ता, नाल्या पण कर्मचारी शुन्य. मागील १० वर्षापासून ती इमारत दवाखाण्याची व निवासस्थानाची पडुन आहे. बिल्डिंग धूळ खात आहे आणि त्याच बिल्डिंगची आता दयनीय अवस्था झालेली आहे. तिथे डॉक्टर ही राहत नाही इतर कोणताही कर्मचारी राहत नाही असे सुद्धा असतानाही पुन्हा यावर्षी सरकारने तिथल्या कर्मचाऱ्यांकरिता गाड्या ठेवण्याकरिता लाखो रुपयांचे निकामी शेड उभारीत आहे. ते शेड उभारून कोणत्या कामाचे कारण तिथे ना डॉक्टर राहत नाही ना चपराशी ना पशुपालक मग सरकार लाखो रुपये खर्च करतो कशाला हा न उमगणारा प्रश्न येथिल गावकऱ्यांना पडलेला आहे.
शेड बांधकाम निकृष्ट दर्जाचे व अवैद्य रेतिचा वापर
येथील शेड बांधकामाकरीता पिसेवडधा मार्गावरील नाल्याची अवैद्य रेतीचा सर्रास वापर सुरु असल्याचा आरोप गावकरी करीत आहे. लिजची वाळू जवळपास नाही. बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी झोपडी बनविले नाही त्यामुळे साहीत्य दवाखानण्यात ठेवलेले आहे. विद्युत दवाखाण्यातीलच तिथुनच सामानाची नेआण कधिही होते. यासाठी मात्र दवाखाना पुर्णवेळ दिसते. शेड बांधकामाचे कुठेही बोर्ड नाही. खाली बेड नाही आणि निकृष्ट दर्जाचे सिमेंट वापरत असल्याने बांधकाम खरच मजबूत होईल का ? याची चौकशी करण्याची मागणी गावकरी करित आहेत. तसेच गावातील व्यक्ती बांधकाम करिता रेती आणत असताना महसुल आणि वनविभाग धाड टाकून पकडतात इथे मात्र ठेकेदारावर मेहेरबाण दिसतात.
(the gdv, the gadvishva, dhanora, rangi, gadchiroli news updates)