The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि.०१ : स्थानिक धानोरा श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालीत श्री जी.सी.पाटील मुनघाटे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय धानोरा येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार ३१ ऑक्टोबर २०२३ ला सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिन आयोजित करण्यात आला.या प्रसंगी राष्ट्रीय एकता दिन शपथ ग्रहण करण्यात आली.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पंकज चव्हाण यांनी भूषविले, यावेळी डॉक्टर आर.पी.किरमिरे, डॉ.लांजेवार, डॉ.पी.एन.वाघ, डॉ. वीणा जम्बेवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख प्रा. ज्ञानेश बनसोड यांनी केले. राष्ट्रीय एकता दिन व सरदार वल्लभभाई पटेल यांचे बाबत बहुमूल्य विचार प्रमुख अतिथी डॉ. गणेश चूधरी यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे आभार डॉ.प्रियंका पठाडे यांनी मानले. याप्रसंगी डॉ.झाडे, डॉ.धवनकर , डॉ.मुरकुटे, पुण्यपरेड्डीवार, प्रा.भैसारे, प्रा.डॉ.गोहने, डॉ. धवानकर, प्रा. मानतेश तोंडरे इत्यादि प्राध्यापक व कर्मचारी वृंद तसेच विद्यार्थी उपस्थित होते.