– २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा म्हणून सुरू राहणार
The गडविश्व
नवी दिल्ली, १९ मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवार १९ मे रोजी मोठा निर्णय घेत २ हजारांच्या नोटा वितरणातून बाहेर काढल्या आहेत. दरम्यान आपल्याकडे २ हजारच्या नोटा असतील तर त्या २३ मे ते ३० सप्टेंबरपर्यंत बँकेत जमा करता येणार आहेत. एकावेळी २० हजार रुपये म्हणजेच १० नोटा जमा करता येणार आहेत.
नोव्हेंबर २०१६ मध्ये २ हजाराची नोट बाजारात आली होती. त्यानंतर आरबीआयने २०१९ पासून २ हजारांच्या नोटांची छपाईसुद्धा बंद केली होती. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांची नोट “इतर मूल्यांच्या नोटा बाजारात पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत,” असे कारण देत वितरणातून काढण्याचा निर्णय जाहीर केला असला तरी २ हजार रुपयांच्या नोटा कायदेशीर निविदा (legal tender) म्हणून सुरू राहणार आहेत. तर २००० च्या नोटा चलनातून काढून घेतल्या असल्या तरी त्या नोटा सध्या अवैध ठरणार नाहीत. त्या दिलेल्या मुदतीपर्यंत जमा करता येणार आहेत.
₹2000 Denomination Banknotes – Withdrawal from Circulation; Will continue as Legal Tenderhttps://t.co/2jjqSeDkSk
— ReserveBankOfIndia (@RBI) May 19, 2023
(the gdv, the gadvishva, rbi, 2000 rupes not)