– वाचनालयांसोबतच विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी झाला “वाचन प्रेरणा दिवस” साजरा
The गडविश्व
गडचिरोली, १५ ऑक्टोबर : भारत देशाचे माजी राष्ट्रपती व महान शास्त्रज्ञ डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांची जयंती संपूर्ण भारतात “वाचन प्रेरणा दिवस” म्हणून साजरा केला जातो. याच दिवसाचे औचित्य साधून गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून जिल्ह्रातील स्पर्धा परिक्षेची तयारी करणाया विद्यार्थ्यांकरिता१५ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी १०:०० ते ११:०० या कालावधीत “एक तास वाचनाकरिता” या शिर्षकाखाली सर्व विद्यार्थ्यांचे सामूहिक वाचन तसेच गडचिरोली जिल्ह्रातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणाया विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा बद्दल असलेल्या अज्ञानामुळे, त्यांना मिळत नसलेल्या योग्य मार्गदर्शनाच्या अभावामुळे विद्यार्थी हे स्पर्धा परिक्षेत मागे पडत आहेत. करीता शालेय विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची व स्पर्धापरिक्षा विषयीची ओढ निर्माण व्हावी, त्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल व्हावी व त्यांचा स्पर्धा परिक्षेकडे कल वाढावा यासाठी गडचिरोली पोलीस दल पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून व यशोरथ स्पर्धा परीक्षा टेस्ट सिरीज, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट उडाण” अंतर्गत आज १५ ऑक्टोबर रोजी गडचिरोली पोलीस मुख्यालय येथील शहिद पांडु आलाम सभागृह तसेच एक गाव एक वाचनालयाअंतर्गत गडचिरोली जिल्ह्रातील पोस्टे/उपपोस्टे/पोमकें ठिकाणी उभारण्यात आलेल्या प्रत्येक वाचनालयामध्ये मोफत पोलीस भरती सराव पेपर क्र. ०३ टेस्ट सिरीज चे आयोजन करण्यात आले. याचा उपयोग विद्यार्थ्यांना येणाऱ्या, वनरक्षक, संयुक्त परीक्षेकरीता होणार आहे. यासोबतच विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये स्वयंप्रेरणा निर्माण व्हावी याकरिता आय एम कलाम हा चित्रपट दाखविण्यात आला.
यावेळी सदर स्पर्धा परीक्षा सराव पेपर करीता पोलीस मुख्यालय व विविध पोस्टे/उपपोस्टे/पोमकें स्तरावरुन एकुण 4500 विद्यार्थ्यांनी परिक्षा दिली. दुर्गम भागातील भामरागड, अहेरी, एटापल्ली, हेडरी व सिरोंचा या ठिकाणी ही विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतीसाद दिला. अनेक ठिकाणी वाचनालय तसेच ग्रामपंचायत कार्यालयाच्या ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्या. या आयोजीत सराव पेपर दरम्यान मा. अपर पोलीस अधीक्षक कुमार चिंता सा. यांनी शहिद पांडु आलाम सभागृहामध्ये घेतलेल्या सराव पेपरला उपस्थित ८५० विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व भविष्यात येणाया वनरक्षक, आरोग्य सेवक, कृषी सेवक, इ. परिक्षांच्या पेपरचा कशा पद्धतीने सराव करावा याबद्दल माहिती दिली.
या कार्यक्रमात पोलीस अधीक्षक नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) कुमार चिंता सा., प्रभारी पोलीस उप-अधीक्षक (गृह) विश्वास जाधव हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्ह्रातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, पोस्टे/ उपपोस्टे/पोमकेचे सर्व प्रभारी अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि. धनंजय पाटील व सर्व पोलीस अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.