भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ योजनेअंतर्गत अग्नीवीरवायु पदांची भरती

779

The गडविश्व
गडचिरोली, २७ जुलै : भारतीय वायुसेनेच्या अग्नीपथ या योजनेअंतर्गत अग्निवायू म्हणून भारतीय वायू सेनेत प्रवेश घेवू इच्छिणाऱ्या उमेदवारांकरिता जाहिरात प्रसिदध करण्यांत आली आहे.
सदर जाहिरातीव्दारे अग्नीवायू पदाच्या परीक्षेकरिता http://agnipathvayu.cdac.in या संकेतस्थळावर उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याचा कालावधी २७ जुलै २०२३ ते १७ ऑगस्ट २०२३ पर्यंतचा आहे. अग्निवायू पदांकरिता २७ जून २००३ आणि २७ डिसेंबर २००६ च्या दरम्यान जन्म झालेला असावा.

हे उमेदवार अर्ज करण्याकरिता पात्र असतील

अग्नीवीरवायू पदाची ऑनलाईन परिक्षा १३ ऑक्टोबर २०२३ रोजी पासून असणार आहे. अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पोलीस मुख्यालया समोर शासकीय संकुल बॅरेक क्र.2, गडचिरोली या कार्यालयास संपर्क साधावा. असे सहायक आयुक्त ‍जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली. यांनी कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here