गडचिरोली जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट : उद्या सर्व शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

2020

-जिल्हाधिकारी यांनी काढले आदेश
The गडविश्व
गडचिरोली, २१ जुलै : जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने व हवामान विभागाने दिलेल्या अलर्ट नुसार जिल्ह्यातील सर्व शाळा, विद्यालये, महाविद्यालयांना उद्या शनिवार २२ जुलै रोजी प्रशासनाच्या वतीने सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी यांनी निर्गमित केले आहे.
जिल्ह्यातील अनेक भागात मागील ५  दिवसांपासून मुसळधार पाऊसासह अतिवृष्टी झाल्याने गोदावरी, प्राणहिता, वांडिया, पर्लकोटा, पामुलगौतम, इंद्रावती नद्यांच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढ होत असून सदर पाणलोट क्षेत्रातील नद्या व नाल्यांना पूर आल्याने जिल्हयातील अंतर्गत मार्ग बंद आहेत. तसेच भारतीय हवामान विभागाचे प्रादेशिक कार्यालय, नागपूर व हैदराबाद द्वारा आज २१ जुलै रोजी प्रसारित हवामान संदेशानुसार पुढील २४ तासाकरिता गडचिरोली, चंद्र्पुर जिल्हा व गडचिरोली जिल्ह्यातील गोदावरी, प्राणहिता नदीतील पाणलोट क्षेत्रातील तेलंगणा राज्यातील काही जिल्ह्याना रेड अलर्ट घोषित करून मुसळधार पावसासह अत्यंत मुसळधार पाऊसाची दाट शक्यता वर्तविली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, गडचिरोली संजय मीणा यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ अंतर्गत पूरपरिस्थितीवर उचित प्रतिबंधात्मक उपाययोजनेतंर्गत उद्या २२ जुलै रोजी गडचिरोली जिल्हा सीमाक्षेत्रामधील सर्व शाळा, विद्यालये, अंगणवाडी, महाविद्यालये सदर कालावधीत बंद असतील तसेच सदरचे आदेश केवळ शाळा, विद्यालये, महाविद्यालये करिता लागू असून इतर सर्व कार्यालये, आस्थापना, दुकाने इत्यादींना सदरचे आदेश लागू नाही असे कळविले आहे.
आदेशाचे पालन न करणारी / उल्लंघन करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समुह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ तसेच भारतीय दंड संहिता १८६० नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here