तृतीयपंथी समुदायाचे कल्याणकरीता नोंदणी अभियान

238

The गडविश्व
गडचिरोली, १८ फेब्रुवारी : राज्यातील तृतीयपंथीयांच्या कल्याणसाठी व त्यांच्या हक्काचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने तृतीयपंथी हक्काचे संरक्षण आणि कल्याण मंडळ स्थापन करणेबाबतचा मुद्दा तिसऱ्या महिला धोरणामध्ये समाविष्ठ आहे. तृतीयपंथी / ट्रॉसजेन्डर हा समाजातील एक दुर्लक्षित घटक असून या घटकास समाजाकडून सापत्न व भेदभावाची वागणूक दिली जाते. नेहमीच भेदभाव,सापत्न वागणुकीमुळे समाजातील हा घटक विकास प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे.त्यामुळे या समाज घटकांचे शासनामार्फत मुलभूत अधिकारांचे संरक्षण करुन त्यांना विकासाची समान संधी उपलब्ध करुन देणे आवश्यक आहे.
या समाज घटकांची सर्वागीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या विकास प्रवाहात आणले जावे याकरीता गडचिरोली जिल्हयातील तृतीयपंथीयांचे संस्था,तृतीयपंथीयांच्या मंडळे व तृतीयपंथी यांची नावे,शैक्षणिक पात्रता,पत्ता व भ्रमणध्वनीसह या कार्यालयात नोदंणी करण्यात यावी. व अधिक माहितीकरीता सहाय्यक आयुक्त,समाज कल्याण,गडचिरोली कार्यालयीन संपर्क क्र.07132-222192 यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.असे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण,गडचिरोली यांनी कळविले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Shivratri images) (Karachi J-Hope) (Mahashivratri 2023) (Barcelona vs Man United) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here