– जिल्ह्यातील युवकांनी लाभ घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आवाहन
The गडविश्व
गडचिरोली, दि.१४ : भारतीय सैन्यात अग्निवीर भरती प्रक्रीया करिता 13 फेब्रुवारीपासून नोंदणी सुरू झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील युवकांनी यासाठी अर्ज करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजय मीणा यांनी केले आहे.
अग्निवीर जनरल ड्युटी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर कार्यालयीन सहाय्यक तथा भांडारपाल, अग्निवीर ट्रेडसमेन या पदांकरिता पात्र उमेदवारांकडून २२ मार्च २०२४ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी व अधिक माहितीसाठी www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे सैन्य भरती कार्यालय, नागपूर यांचेतर्फे कळविण्यात आले आहे.