रास्तभाव धान्य दुकानदारांना दिलासा : कमिशनमध्ये तात्पुरती २० रुपयांची वाढ
The गडविश्व
गडचिरोली, दि. १६ : अखिल महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार महासंघ व फेडरेशनतर्फे शासनाकडे सादर करण्यात आलेल्या कमिशन वाढीच्या मागणीला दिलासा मिळाला आहे. आज १५ एप्रिल २०२५ रोजी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा झाली. या चर्चेनंतर तात्पुरत्या स्वरूपात २० रुपयांची कमिशन वाढ देण्याची हमी सरकारकडून देण्यात आली असून, अधिक वाढीबाबत विचार सुरू असल्याचे मंत्री महोदयांनी स्पष्ट केले.
या निर्णयामुळे राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदारांमध्ये समाधानाची लाट आहे. हा निर्णय ना. अजित पवार यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे शक्य झाल्याबद्दल संघटनेने त्यांचे विशेष आभार मानले आहेत.
“ही फक्त सुरुवात आहे. आपली मेहनत, चिकाटी आणि एकजूट यामुळेच हे यश मिळाले आहे. मात्र ही लढाई अजून संपलेली नाही. आपल्या सर्व मागण्या पूर्ण होईपर्यंत संघटितपणे लढा सुरूच राहील,” असे प्रतिपादन रुपेश वलके, कार्यकारी कार्याध्यक्ष, रास्त भाव धान्य दुकानदार संघटना गडचिरोली यांनी केले.
