The गडविश्व
ता.प्र / धानोरा, दि. १६ : पत्रकार लोकशाहीतील चौथा स्तंभ असुन तालुक्याच्या विकासात पत्रकाराची भूमिका महत्त्वाची आहे. तसेच धानोरा येथे सर्वच वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी आहे परंतु धानोरा येथे पत्रकार भवन नाही. तसेच समस्या मांडण्याकरता तालुक्यातील लोकांना पत्रकार भावनांच्या इमारतीची नितांत गरज असल्याने आदर्श पत्रकार संघ धानोरा तर्फे पत्रकार भवन साठी तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
आदर्श पत्रकार संस्था रजिस्टर नंबर महा /09/2017 रोजी रजिस्टर झाली असून प्रत्येक तालुक्यामध्ये पत्रकार संघांना महसूल विभागातर्फे पत्रकार भवनासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाते. परंतु धानोरा येथे पत्रकार संघाला स्वतःच्या मालकीची पत्रकार भवन नाही ही मोठी शोकांतिका आहे. पत्रकार परिषद घेण्यासाठी पत्रकारांना विश्रामगृह येथे पत्रकार परिषद आयोजित करावी लागते त्यावेळेस ती कधीकधी देण्यास टाळाटाळ करतात आणि म्हणून आपल्या स्तरावरून आदर्श पत्रकार संघ यांना जागा उपलब्ध करून द्यावे यासाठी राहुल पाटील तहसीलदार धानोरा यांना आदर्श पत्रकार संघातर्फे निवेदन देण्यात आले.
निवेदन देतेवेळी आदर्श पत्रकार संघाचे अध्यक्ष समीर कुरेशी, सचिव भाविकदास करमनकर आदी उपस्थित होते.