निवृत्त शिक्षक भरती वरून आदिवासी विकास परीषद व आजाद समाजवादी पार्टी आक्रमक

466

– आदिवासी विकास परिषद व एएसपी कडून मुख्यमंत्र्यांना निवेदन
The गडविश्व
ता. प्र / कुरखेडा, दि. २७ : ‘पेसा क्षेत्रातील रिक्त शिक्षकांच्या पदावर सेवानिवृत्त शिक्षकांना घेण्याच्या’ शालेय शिक्षण विभागाच्या वतीने १५ जुलै २०२४ रोजी काढलेल्या आदेशाला विरोध करत आजाद समाज पार्टी ने १८ जुलै रोजी प्रशासनाला निवेदन देऊन सुशिक्षित बेरोजगारांना या भरतीत संधी द्यावी अशी मागणी केली होती.
या मागणीचा कोणताही पाठपुरावा न करता २२ जुलै २०२४ रोजी मुख्य कार्यकारी अधिकारीने निवृत्त शिक्षकांना आवेदन करण्यासाठी पत्रक काढले. जिल्यातील सुशिक्षित बेरोजगारांची ही अवहेलना असून, ३०-४० हजाराची पेन्शन घेणाऱ्यांना शिक्षक पदावर घेणे म्हणजे बेरोजगारीला वाढविण्याचे धोरण आहे असा आरोप करत आजाद समाज पार्टी व आदिवासी विकास परिषद आक्रमक झाली असून जिल्ह्यातील विविध तालुक्यात तहसीलदार मार्फत मुख्यमंत्रीना निवेदन देऊन सेवानिवृत्त शिक्षकांना पदावर न घेता बेरोजगार डीएड, बिएड, एमएड झालेल्या तरुणांना संधी देण्यात यावी. अशी मागणी केली जर ३० जुलै पर्यंत सदर निर्णय मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
यावेळी कुरखेडा येथे निवेदन देताना आजाद समाज पार्टी तालुकाध्यक्ष सावन चिकराम, सचिन गेडाम व आदिवासी विकास परिषद तालुकाध्यक्ष अंकुश कोकोडे, प्रवेश सहारे, रवींद्र कुमरे, भूपाल सयाम, शिवम जुमनाके, रामेश्वर राऊत, महेंद्र मडावी, विकास कुळमेथे, राजेश्वर राऊत, श्याम कुळमेथे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

(#thegdv #thegadvisvha #gadchirolinews )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here