सेवा निवृत्त होणे म्हणजे भावुक होणारा क्षण : आमदार डॉ. देवराव होळी

90

– सेवा निवृत्त संजयजी साखरे व अर्धांगिनी संगीता साखरे यांचा आमदार डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सत्कार
The गडविश्व
चामोर्शी, दि. १५ : होमगार्ड पथकात इतकी वर्षे नोकरी केल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात न टाळता येणारा दिवस म्हणजे ‘सेवानिवृत्तीचा’. कामावर असताना सेवानिवृत्त झाल्यानंतर काय करु याची स्वप्न अनेकांनी पाहिलेली असतात. पण न कळत हा दिवस आल्यानंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी तरळते. आयुष्याची सेकंड इनिंग सुरु झाली. पण ज्या मित्रांच्या आणि सहकाऱ्यांच्या साथीने तुम्ही तुमचे दिवस घालवलेले असतात ते पुन्हा येण्याची संधी आयुष्यात परत मिळणार नसते. तसेच सेवा निवृत्त होणे म्हणजे भावुक होणारा क्षण असे प्रतिपादन आमदार डॉ. देवराव होळी यांनी सेवा निवृत्त समारंभ प्रसंगी केले
यावेळी पोलीस निरीक्षक अमूल सादबाने, भाजपा जिल्हा सचिव दिलीप चलाख, प्रभारी अधिकारी संजय कोनसरे, मानकर मेजर, तसेच होमगार्ड मित्रपरिवाराचे सदस्य उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here