अबब… रेतीतस्करांनी चक्क वैनगंगा नदीपात्र पोखरले, महसूल विभागाचे दुर्लक्ष

215

– कोंढाळा येथील पिंपळगाव रेतीघाटावर रेती तस्करांनी केला कब्जा
The गडविश्व
गडचिरोली, दि.०४ : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वनसंपदा व गौनखनिज साठा उपलब्ध आहे. मात्र काही यावर डोळा लावून त्याची लयलूट करतांनाचे चित्र आहे. याचे रक्षणकर्तेही होणाऱ्या लयलूट बघ्याची भूमिका घेतांना दिसत असून दुर्लक्ष करीत आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा येथील पिंपळगाव घाटातील वैनगंगा नदी पात्रातून रेती तस्करांनी बेसुमार अवैध रेतीचा उपसा करून नदीपात्र पोखरून काढले आहे. कोंढाळा येथे तर संपूर्ण घाटात रेतीच शिल्लक उरली नाही. रेती तस्कर हे बाहेरचे असल्याची माहिती असून त्यांना महसूल प्रशासनाचा आशीर्वाद प्राप्त असल्याची खमंग चर्चा परिसरात सुरू आहे. कोंढाळा येथील रेती घाटातून नियमितपणे रेतीचा उपसा मागील काही दिवसांपासून सुरू आहे.
देसाईगंज तालुक्यातील कोंढाळा गावा लागत वैनगंगा नदी  बारा महिने वाहत असते आणि येथे वैनगंगा नदीचे मोठे पात्र आहे. येथील पात्रातून बेसुमार रेतीचे अवैध उत्खनन करून रेतीची चोरी मागील काही दिवसांपासून सुरू आहे. येथील नदीघाट लिलाव झाला नाही. नदीचा प्रवाह गावाच्या दिशेने येत असल्याने येथील नदीपात्र हे लहान झाले आहे. नदीपात्रातून बेसुमार रेतीच्या उपसा केल्याने या नदीपात्रात केवळ आता मातीचा थर उरला आहे. नदीपात्र पोखरल्याचे चित्र येथे दिसत आहे. परंतु महसूल प्रशासनाने येथे अजूनपर्यंत मोठे कारवाई केली नाही. राज्य शासनाचा महसूल येथे बुडाला आहे. गावापासून ३ किमी अंतरावर वैनगंगा नदीचे पात्र असून येथे अधिकाऱ्यांचेही येणे जाणे असते परंतु त्यांनी येथे अर्थकारणामुळे दुर्लक्ष केल्याचे दिसून येते. नदीपात्रात रेती नसल्याने पावसाळ्यात या गावाला आता धोका निर्माण होऊ शकतो तर नदी काठावर अनेक शेतकऱ्यांचे मोटार पंप आहेत पण रेतीच नसेल तर पाणी साचून राहणार काय असा ही प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे . कोंढाळा येथील नदीपात्रात रेती तस्करीमुळे परिसरात मोठा खड्डा निर्माण झाला आहे. पाण्याचा प्रभाव येथे या खड्ड्यामुळे अल्प प्रमाणात वाहत आहे. रेतीची चोरी करणाऱ्यांशी कोण वाद घालणार असा प्रश्न नागरिकांसमोर उभा होता. ग्रामपंचायत प्रशासनही मूग गिळून गप्प असल्याचे दिसून येते.

या घाटावरील सध्या रेती तस्करांचा ताबा असल्याची माहिती आहे. रात्री या घाटातून रेतीचे उत्खनन व वाहतूक सुरू आहे. या घाटाकडेही महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. येथील रेती तस्कर गब्बर झाले आहेत. तस्करांच्या मुजोरीपुढे ग्रामस्थांचेही काही चालत नाही. उलट रेती चोरी करणारे मालक आणि मजूर कोण येतोय आणि काय करतात तर बघून घेऊ अशी वक्तव्य येऊ लागल्याने गुंडशाही वाढल्याचे चित्र आहे. रेती तस्करांची तक्रार केल्यानंतर उलट त्यांची नावे सांगितली जातात. त्यामुळे त्यांची तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नाही. तर नदीपात्रात मुरूम टाकून अर्धा किमी रस्ता बनवून रेती तस्करी केली जात आहे। अनेकदा या घाटावर कर्मचारी गेले आहेत पण त्यांना रस्ते बनवले ते दिसले नाही का असा ही प्रश्न उद्भवतो. कोणी तरी या घाटाचा वाली आहे का वाली ? असे सुद्धा बोल काही नागरिकांतुन ऐकायला मिळत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here