रब्बी हंगाम सन २०२२-२३ वर्षाची रब्बी पिकाची सुधारित पैसेवारी जाहीर

161

The गडविश्व
गडचिरोली, १५ फेब्रुवारी : रब्बी पिकाची सुधारीत पैसेवारी तहसिलदार यांचेकडून प्राप्त माहितीचे आधारे संकलीत करुन गडचिरोली जिल्ह्याची सन २०२२-२०२३ या वर्षाची रब्बी पिकाची सुधारित पैसेवारी जाहीर करण्यात येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात एकूण १६८९ गावे असून रब्बी पिकाची गावे १४८ आहेत. त्यापैकी रब्बी गावामध्ये पीके नसलेली गांवे ९४ आहेत. सदर रब्बी पिक असलेल्या गावापैकी ५० पैशाचे आत पैसेवारी असलेले रब्बी गावे ० असून ५० पैशाचे वर पैसेवारी असलेल्या एकूण रब्बी पिक असलेल्या गावांची संख्या ५४ आहेत. अशा प्रकारे एकूण ५४ रब्बी पिक असलेल्या गावाची पैसेवारी जाहीर केलेली आहे. गडचिरोली जिल्ह्याची रब्बी हंगाम २०२२-२०२३ या वर्षाची सुधारीत पैसेवारी ही ०.६४ आहे. असे जिल्हाधिकारी, गडचिरोली यांनी कळविले आहे.

(The Gadvishva ) (Gadchiroli News Updates) (Muktipath) (Valentine’s Day gifts) (Valentine’s Day) (PSG vs Bayern) (Liverpool vs Everton) (Super Bowl) (Chelsea) (PSG) vs Toulouse) (Man United vs Leeds United)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here