The गडविश्व
ता. प्र / धानोरा, दि. १८ : येथील जिल्हा परिषद हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या राष्ट्रीय लोकसंख्या शिक्षण प्रकल्प 2024 -25 अन्वये “इंटरनेटचा सुरक्षित वापर आणि मीडिया साक्षरता ” या विषयावर नक्षलग्रस्त आदिवासी जिल्ह्याचे नेतृत्व करीत विभाग स्तरीय भूमिका अभिनय स्पर्धा पार पडली. त्यात धानोरा येथील विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करून राज्य स्तरावर झेप घेतल्याने विद्यार्थाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
गडचिरोली जिल्ह्याच्या पूर्व दिशेला असलेल्या धानोरा तालुक्याची ओळख अतिदुर्गम अशी आहे. पण ओळख मिटवित १७ ऑक्टोबर २०२४ रोजी राज्य विज्ञान शिक्षण संस्था रवी नगर नागपूर येथे विभागीय स्पर्धा संपन्न झाली. या विभागीय स्तरावर झालेल्या स्पर्धेमध्ये एकूण सहा जिल्ह्यातील चमूने भाग घेतला होता. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचे नेतृत्व करीत जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा येथील विद्यार्थ्यांनी विभाग स्तरावर गडचिरोली जिल्हा यांनी प्रथम क्रमांक पटकावित, पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. सदर स्पर्धेमध्ये कुमार नुमान खलील शेख, कुमार करण किशोर बसु, कुमार विपश्य रितेश मशाखेत्री, कुमारी नंदिनी नरेश उसेंडी, कुमारी साक्षी कालिदास पदा, या विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट अभिनय सादर केला. यासाठी कुमारी रजनी मडावी आणि भालेराव शिक्षक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
राज्यस्तरावर निवड झालेल्या गडचिरोली जिल्ह्याच्या धानोरा चमुचे शिक्षणाधिकारी पवार , प्राचार्य बी.जी. चौरे, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गडचिरोली, कार्यकारी प्राचार्य धनंजय चापले , डॉ. विनीत मते , विभाग प्रमुख अधिव्याख्याता राठोड, गटशिक्षणाधिकारी सुधीर आखाडे , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष वेणूताई म्हशाखेत्री, उपाध्यक्ष जमीर कुरेशी, मुख्याध्यापक सुरजुसे, दुगा मॅडम, शर्मिष्ठा धाईत, पोर्णिमा मडावी साधन व्यक्ती, पी.व्ही साळवे शिक्षक डॉ. रश्मी डोके, तोटावार, कोलटकर शिक्षक, तथा सर्व कर्मचारी व तालुक्यातील लोकांनी अभिनंदन केले आहे.
(#thegdv #thegadvishva #gadchirolinews #gadchirolilocalnews #dhanora )